आंतराळात महिलांनी रचला इतिहास; पहिल्यांदा महिलांचा स्पेसवॉक

आंतराळात महिलांनी रचला इतिहास; पहिल्यांदा महिलांचा स्पेसवॉक

शुक्रवारी अंतराळात एक नवा इतिहास रचला गेला. हा इतिहास रचन्यामागे दोन महिलांचा मोलाचा वाटा आहे. ज्यामध्ये क्रिस्टिना कोच आणि जेसिका मीर यांची जोडी अंतराळात स्पेसवॉक करणारी पहिली महिला जोडी ठरली आहे. याआधी स्पेसवॉक करणाऱ्या टीममध्ये फक्त पुरुष अंतराळवीरांचा समावेश होता. मात्र पहिल्यांदाच केवळ महिला अंतराळवीरांनी स्पेसवॉक करून नवा इतिहास रचल्याचे सांगितले जात आहे.

४२१ वी स्पेसवॉक करून रचला इतिहास

स्पेसवॉक करणाऱ्या प्रत्येक टीममध्ये पुरुष अंतराळवीर असायचेच. यापुर्वी ४२० स्पेसवॉक करण्यात आले होते. मात्र पहिल्यांदा असे झाले की, फक्त महिलांनी स्पेसवॉक केले आहे. या दोघी ही नासाच्या अंतराळवीर असून तब्बल साडेपाच तास हा स्पेसवॉक चालणार आहे. हा ऐतिहासिक स्पेसवॉक सुरू झाला तेव्हा आंतराळ केंद्रात असलेले सर्व चार पुरुष अंतराळवीर केंद्रातच थांबले. तर जेसिका आणि क्रिस्टिना या दोघी तुटलेला बॅटरी चार्जर बदलण्यासाठी अंतराळात केंद्राच्या बाहेर स्पेसवॉक करताना दिसून आल्या आहेत.

ऐतिहासिक घटनेनंतर नासाच्या सेंटरने केले ट्विट

या ऐतिहासिक घटनेनंतर नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरने ट्विट करत आज ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगितले आहे. तुम्ही जिथे असाल तिथून तुमच्या शुभेच्छा आणि प्रोत्साहन द्या, असे या ट्विटमध्ये सांगितले आहे. तर आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रानेही एक व्हिडिओ देखील शेअर करताना असे लिहीले की, स्पेसवॉकर क्रिस्टिना आणि जेसिका स्पेसच्या बाहेर उभ्या आहेत. बिघडलेल्या पॉवर कंट्रोलची दुरुस्ती करण्यासाठीची अवजारांना त्या घेत आहेत, असे या ट्विटमध्ये सांगितले आहे.

First Published on: October 18, 2019 8:14 PM
Exit mobile version