CoronaEffect: मध्य प्रदेशमध्ये नवजात बालकाचे नाव ठेवले ‘लॉकडाऊन’!

CoronaEffect: मध्य प्रदेशमध्ये नवजात बालकाचे नाव ठेवले ‘लॉकडाऊन’!

१४ महिन्याच्या बाळाची कोरोनाशी झुंज संपली

जगभरात सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे आणि ती म्हणजे कोरोना व्हायरस. या विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेक देश लॉकडाऊन करण्यात आले आहेत. भारतामध्येही २१ दिवसांचा लॉकडाऊन मोदी सरकारने जाहीर केला आहे. सर्व स्तरातून या लॉकडाऊन विषयी संमिश्र प्रतिक्रिया येत असताना काही जण तर लॉकडाऊनला पुरते वैतागले आहेत. मात्र एका दाम्पत्याने त्यांच्या बाळाचेच नामकरण लॉकडाऊन असे केले आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना. हो, हे खर आहे. मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात नुकत्याच जन्मलेल्या एका मुलाचे नाव त्याच्या माता-पित्याने लॉकडाऊन असे ठेवले आहे. सध्या या आगळ्यावेगळ्या नावाची चर्चा येथील परिसरात होत आहे.

काय आहे प्रकरण

मध्य प्रदेशमधील श्योपूर जिल्ह्यातील बछेरी गावात राहणाऱ्या रघुनाथ माली आणि त्यांची पत्नी मंजू यांना सोमवारी मुलगा झाला असून त्यांनी त्याचे नाव लॉकडाऊन ठेवले आहे. २४ वर्षीय मंजू हिला प्रसुतीसाठी सोमवारी सकाळी शहरातील खासगी हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. सध्याची परिस्थिती पाहता या दाम्पत्याने त्यांच्या मुलाचेच नाव लॉकडाऊन ठेवले आहे.

मिठाईचे नाव ठेवले कोरोना 

कोलकत्यामधील एक मिठाईवाला कोरोना व्हायरससारखी हुबेहूब मिठाई बनवून विकत आहेत. बंगालच्या एका महिलेने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून कोरोना व्हायरसच्या मिठाईचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने असं लिहिले की, कोणी आपल्या मुलाचे नाव कोरोना आणि कोविड असे ठेवत आहे. तर बंगालचा हा मिठाईवाला कोरोना व्हायरससारख्या मिठाई बनवून विक्री करत आहे. क्रेजी लोकं. या फोटोवर अनेक लोकांनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा –

Coronavirus Lockdown: मुलाचा इंग्लंडमध्ये मृत्यू; पालक पुण्यात लॉकडाऊन

First Published on: April 7, 2020 10:27 AM
Exit mobile version