दिवाळीला केली जाते चक्क कुत्र्यांची पूजा

दिवाळीला केली जाते चक्क कुत्र्यांची पूजा

कुत्र्याची पूजा (सौजन्य-एएनआय)

भारतात सणावाराला गायी, बैल आणि नागाची पूजा करण्याची प्रथा आहे. मात्र काही ठिकाणी चक्क कुत्र्यांची पूजा करण्याचीही प्रथा आहे. त्याचप्रमाणे या देशात दिवाळीला कुत्र्याची पूजा करण्याची प्रथा आहे. ऐकून अजब वाटलं ना. पण हे खर आहे. नेपाळमध्ये दिवाळीला कुत्र्याची पूजा करण्याची प्रथा आहे. याला ‘कुक्कुर तिहार’ असे म्हटले जाते. भारताप्रमाणेच नेपाळमध्येही मोठया प्रमाणावर हिंदू असून ते दिवाळी सणाला कुत्र्याची पूजा करतात. नेपाळमध्ये दिवाळीला तिहार म्हटले जाते. तिहारच्या दुसऱ्या दिवशी कुत्र्यांची पूजा करण्याची प्रथा आहे.

पाळीव असो रस्त्यावरील कुत्रे

कुक्कुर तिहारच्या निमित्ताने कुत्र्यांच्या पौराणिक महत्वाचे स्मरण केले जाते. श्वान हे कुत्र्याचे संस्कृत नाव असून वेदांमध्ये त्याचा उल्लेख आहे. कुक्कुर तिहारला कुत्र्यांना ओवाळून ताज्या फुलांचा हार करुन त्यांच्या गळ्यात घातला जातो. पाळीव श्वान असो वा रस्त्यावरचा कुत्रा सर्वांनाच त्या दिवशी एकसमान वागणूक दिली जाते.

कुत्र्याला इमानी म्हटलं जातं

कुत्रा प्रामाणिक, इमानी प्राणी म्हणून ओळखला जातो. पौराणिक काळापासूनचे अनेक संदर्भ सापडतील, ज्यामध्ये कुत्र्याने माणसाला साथ दिली आहे. घरात एखादा प्राणी पाळण्याचा विषय येतो, तेव्हा माणसाची पहिली पसंती कुत्र्यालाच असते. घर राखण्यापासून ते चोराला शोधून काढण्यापर्यंत माणसाला कुत्र्याची मदत होते. नेपाळमध्ये दिवाळी सणाच्या निमित्ताने कुत्र्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.

First Published on: November 6, 2018 8:31 PM
Exit mobile version