या देशांमध्ये सैन्यदलासाठी आहे अग्निपथसारखेच नियम

या देशांमध्ये सैन्यदलासाठी आहे अग्निपथसारखेच नियम

प्रातनिधिक छायाचित्र

केंद्र सरकारने सैन्यदलातील भरतीसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. या योजनेतंगर्त चार वर्षांच्या कंत्राटावर सैन्य भरती केली जाणार आहे. तसेच त्यापुढे सेवेत आहे. त्यात उतीर्ण होणाऱ्यांनाच सेवेत कायम ठेवले जाणार आहे. तर जे सैनिक या परिक्षांमध्ये यशस्वी होऊ शकणार कायम राहण्यासाठी अग्निवीरांना म्हणजेच या योजने अंतर्गत निवड झालेल्या सैनिकांना मूल्यमापन परिक्षा द्यावी लागणारनाहीत त्यांची सेवा चार वर्षानंतर संपुष्टात येईल. याचमुद्द्यावरून सैन्यदलात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी एल्गार पुकारला असून देशभरात मोदी सरकारविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. मात्र अग्निपथसारख्याच योजना काही देशांमध्येही अनेक वर्षांपासून राबवल्या जात असून तेथील तरुण तरुणी आयुष्यातील काही वर्ष देशसेवेसाठी आनंदाने देताना दिसत आहेत. (In these countries, the rules for the military are the same as for Agneepath)

इस्त्रायल

इस्त्रायलमध्ये सैन्यसेवा ही तरुण तरुणींसाठी सक्तीची आहे. २०२० पर्यंत तरुणांसाठी सैन्यदलातील कार्यकाल हा दोन वर्ष सहा महिने एवढा निश्चित करण्यात आला होता. तर महिलांसाठी हाच कार्यकाल दोन वर्ष एवढा आहे.

हेही वाचा – लष्कर भरती अग्निपथ योजनेतूनच होणार, FIR असणाऱ्यांना सैन्यात नो एन्ट्री – DMA

बरमुडा

बरमुडा हा ग्रेट ब्रिटनमधील एक प्रदेश आहे. पण तरीही आपल्या स्थानिक सुरक्षेसाठी येथे सैन्यभरती केली जाते. तसेच १८ ते ३२ वयोगटातील तरुण आणि पुरुषांना ३८ महिन्यांसाठी येथे सैन्यदलात सेवा देणे अनिर्वाय आहे. त्यासाठी लॉटरी पद्धतीचा वापर केला जातो.

ब्राझील

ब्राझीलमध्ये पुरुषांना वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर १२ महिन्यांसाठी सैन्यदलात सेवा द्यावी लागते. मात्र जर एखाद्या व्यक्तीला आरोग्यासंबंधी तक्रारी असतील तर त्याला यातून सवलत देण्यात येते. तसेच जर व्यक्ती पदव्युत्तर शिक्षण घेत असेल तर त्यालाही या सेवेतून सवलत दिली जाते.

हेही वाचा – अग्निपथ योजनेत मोठा बदल, सीआरपीएफ आणि आसाम रायफल्ससाठी महत्त्वाचा निर्णय

सायप्रस

सायप्रसमध्ये १७ आणि ५० वर्ष वयोगटातील पुरुषांसाठी सैन्यदलात सेवा करणे सक्तीचे आहे. त्यातही २००८ नंतर अमेर्नियाई, लैटीन आणि मैरोनाईट्समध्ये धार्मिक संबंधांशी संबंधित असलेल्या पुरुषांनाही सरकारने सैन्यदलात सामील केले आहे. २४ महिने त्यांना सैन्यदलात काम करावे लागते.

रशिया

रशियामध्ये १८ ते २७ वर्ष वयोगटातील पुरुषांना सैन्यदलात काम करणे सक्तीचे आहे. १९८० च्या दशकात सैन्य सेवेचा कालावधी २ वर्षांहून कमी करून १८ करण्यात आला होता. मात्र १९९५ मध्ये सरकारमधील बदलांमुळे ही सेवा पुन्हा दोन वर्ष करण्यात आली.

मेक्सिको

मेक्सिकोमध्ये २००० सालानंतर महिलांना देखील सैन्य सेवेत सामील करुन घेण्यात आले आहे. तसेच वयाची १८ वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांसाठी सैन्यदलात जाणे सक्तीचे आहे. वयाच्या २१ व्या वर्षापर्यंत त्यांना सैन्यदलात काम करावे लागते.

सिंगापूर

सिंगापूरमध्ये प्रत्येक नागरिकाला एनएस म्हणेज राष्ट्रीय सेवा करावी लागते. त्यानंतर या तरुणांना सिंगापुर नागरिक सुरक्षा दल (एससीडीएफ)मध्ये किंवा सिंगापुर पोलीस दलात समाविष्ट केले जाते. सैन्यदलाची ही सेवा नागरिकांना सक्तीची असून त्यास विरोध दर्शवणाऱ्यास तीन वर्ष किंवा त्याहून अधिक वर्षांचा कारावासाच्या शिक्षेसह १० हजार सिंगापुरीयन डॉलर्स एवढा दंड ठोठावला जातो.

हेही वाचा – अग्निपथ योजनेविरोधात बिहारमध्ये आंदोलन चिघळले, पाचहून अधिक ट्रेन पेटवल्या, तिकीट काउंटरही जाळले

संयुक्त अरब देश

संयुक्त अरब अमिराती देशांमध्ये १७ ते ३० वर्षांमधील सर्वच पुरुषांना सैन्यदलात सेवा देणे सक्तीचे आहे. १६ महिन्यासाठी त्यांना ही सेवा करावी लागते.

First Published on: June 19, 2022 5:38 PM
Exit mobile version