पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या वॉटर मेट्रो सेवेचे उद्घाटन; पाहा कशी आहे?

पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या वॉटर मेट्रो सेवेचे उद्घाटन; पाहा कशी आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील पहिल्या वॉटर मेट्रो सेवेचे उद्घाटन केले. पोर्ट सिटी कोचीमध्ये बांधण्यात आलेली मेट्रो कोची शहराला जवळपासच्या 10 बेटांशी जोडणारी आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात हायकोर्ट-वायपिन टर्मिनल्सपासून वायटीला-कक्कनड टर्मिनल्सपर्यंत सेवा सुरू करण्यात येणार आहे. (Inauguration of the country first water metro service by Prime Minister Modi In Kochi)

वॉटर मेट्रो प्रकल्प इतर राज्यांसाठी आदर्श

‘देशातील सार्वजनिक वाहतुकीचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने आणखी एक प्रयत्न करण्यात आला आहे. स्थानिक परिस्थितीला अनुरूप ‘मेड इन इंडिया’ सोल्यूशन्स देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सेमी हायस्पीड गाड्या असोत, रो-रो फेरी असोत, रोप-वे असोत. जिथे गरज आहे तिथे तशी यंत्रणा तयार केली जात आहे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

‘कोची वॉटर मेट्रोचा प्रकल्पही ‘मेड इन इंडिया’ आहे. तो अद्वितीय आहे. वॉटर मेट्रोमुळे कोचीच्या आसपासच्या अनेक बेटांवर राहणाऱ्या लोकांना स्वस्त आणि आधुनिक वाहतूक उपलब्ध होईल. यामुळे कोचीची वाहतूक समस्याही कमी होणार असून बॅक वॉटर टुरिझमलाही नवे आकर्षण मिळणार आहे. केरळमध्ये होत असलेला हा प्रयोग इतर राज्यांसाठीही आदर्श ठरेल’, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

‘अशी’ आहे पहिली वॉटर मेट्रो

तुम्ही डिजिटल पद्धतीनेही तिकीट बुक करू शकता

‘कोची-1’ कार्ड वापरून प्रवासी कोची मेट्रो आणि वॉटर मेट्रो या दोन्ही मार्गांनी प्रवास करू शकतात. याशिवाय ते डिजिटल पद्धतीनेही तिकीट बुक करू शकतात.


हेही वाचा – कर्नाटकात भाजपाला संपूर्ण बहुमत मिळेल; देवेंद्र फडणवीसांना विश्वास

First Published on: April 25, 2023 4:23 PM
Exit mobile version