हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ, निष्क्रिय जीवनशैली ठरतेय प्राणघातक

हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ, निष्क्रिय जीवनशैली ठरतेय प्राणघातक

देशात सातत्याने वाढणारे प्रदूषण, रोग, विविध प्रकारचे आजार, या सर्व गोष्टींचा परिणाम मनुष्याच्या जीवनशैलीवर होत आहे. तसेच हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यच्या संख्येत देखील वाढ होत आहे. परंतु यामागे एक मुख्य कारण असल्याचं सांगितलं जातंय, तो म्हणजे कोरोना. मागील दोन वर्षांत कोरोनाने देशात धूमाकुळ घातला होता. अद्यापही कोरोना विषाणू हा पूर्णपणे गेलेला नाहीये.

कोरोना कालावधीच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक रुग्णांनी रुग्णालयात जाणे टाळले. त्यामुळे त्यांना योग्य ती औषधं मिळू शकली नाहीत. ज्या रुग्णांनी कोरोना ओळखण्यास उशीर केला त्यामुळे अशा लोकांचा धोका वाढला. यापैकी अनेकांना हृदयविकाराचा त्रास होता. अनेकांमध्ये रक्ताभिसरण नीट होत नाहीये. मेहनत करूनही विश्रांती न घेणे म्हणजे हृदयविकाराच्या झटक्याला आमंत्रण आहे.

आपले जीवन अधिक भौतिकवादी झाले आहे. शारीरिक सक्रियता जवळजवळ संपली आहे. लोक दिवसभर खुर्च्यांवर बसून काम करतात. मी माझ्या शरीराला थोडा वेळ देऊ शकत नाही. पैशांच्या मागे इतके धावू नये, शरीराकडेही लक्ष दिले पाहिजे. कामासोबत आरोग्याची काळजी घेतली तर भविष्यात तुमचे आरोग्य निरोगी राहू शकते.

मनःशांतीसाठी, मंदिर हे एकमेव ठिकाण आहे, जिथे काही क्षण विसावा मिळतो, पण व्यस्त जीवनात त्यासाठी वेळ नसतो. आता कुटूंबासाठीही वेळ नसल्याची तक्रार घरातील सदस्य करताना दिसतात. दिवसभर नोकरी किंवा व्यवसायात व्यस्त असलेल्या व्यक्तीला दोन क्षणही विश्रांती मिळत नाही. अशा परिस्थितीत ब्रेन स्ट्रोक कधी येईल हे कळत नाही.

ताणतणाव हा जीवनाचा अविभाज्य भाग

डॉक्टर वारंवार त्यांच्या रुग्णांना सकाळी किमान दोन तास तरी त्यांच्या शरीराला विश्रांती देण्याचा सल्ला देतात. यामुळे मन स्थिर राहून कामाला ऊर्जा मिळेल, पण यावर कोणाचा विश्वास आहे? अधिक पैसे कमावण्याच्या नादात शरीरात उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारखे आजार बळवतात. आता जगणं खूप कठीण झाले आहे. तणाव हा जीवनाचा अत्यावश्यक भाग बनला आहे.


हेही वाचा : भाजपाने उमेदवारी का मागे घेतली? बावनकुळे म्हणाले निवडून येणाऱ्या आमदाराला…


 

First Published on: October 17, 2022 3:27 PM
Exit mobile version