दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदन

दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदन

15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन (Independence Day 2022). या निमित्ताने दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. भारताच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतात ठिकठिकाणी मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ध्वजवंदनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधन करत आहेत. विशेष म्हणजे मोदी सलग नवव्यांदा संबोधीत करत आहेत.

15 ऑगस्ट 1947 रोजी याच दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला. आज आपला भारत 75 व्या अमृत महोत्सव वर्षात पदार्पण करत आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन हा संपूर्ण देशासाठी ‘राष्ट्रीय सुट्टी’ म्हणून पाळला जातो. त्याचे कारण म्हणजे स्वातंत्र्यासाठी आणि ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले आहे.


हेही वाचा – ‘हर घर तिरंगा’सोबत जनतेच्या समस्यांची जाणीव ठेवावी

First Published on: August 15, 2022 7:36 AM
Exit mobile version