Omicron in India: ओमिक्रॉनमुळे भारतात दिवसाला १ लाख रूग्णांची नोंद होणार, फेब्रुवारीत तिसऱ्या लाटेची शक्यता

Omicron in India: ओमिक्रॉनमुळे भारतात दिवसाला १ लाख रूग्णांची नोंद होणार, फेब्रुवारीत तिसऱ्या लाटेची शक्यता

Omicron in India: ओमिक्रॉनमुळे भारतात दिवसाला लाख रूग्णांची नोंद होणार, फेब्रुवारीत तिसरी लाटेची शक्यता

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सार्स कोविड-२ च्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे फेब्रुवारी महिन्यात दिवसाला एक लाखपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होण्याची शक्यता असल्याचे आयआयटीचे वैज्ञानिक मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितले आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रादुर्भाव होण्याचा वेग जलद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद होऊ शकते. काही दिवसांतच भारतातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या २२ वर गेली आहे. यामुळे येत्या २ ते ३ महिन्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

आआयटीचे संशोधक मनिंद्र अग्रवाल म्हणाले की, नव्या कोरोना व्हेरियंटवर असे अनुमान आहे की, देशात फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते परंतु ही लाट दुसऱ्या लाटेपेक्षा सौम्य स्वरुपाची असेल. आतापर्यंत देशात सापडलेल्या रुग्णांमधील संसर्गाचे स्वरुप डेल्टापेक्षा घातक नसल्याचे आढळले आहे. दक्षिण आफ्रिकेतील प्रकरणांवर देशातील संशोधकांची करडी नजर आहे. नव्या नव्या प्रकरणांवर बारकाईने अभ्यास करण्यात येत असल्याचे अग्रवाल म्हणाले. तसेच सध्या दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोना रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याच्या दरात वाढ झाली नसल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

ओमिक्रॉनमुळे फेब्रुवारी महिन्यात दिवसाला १ ते दीड लाख रुग्ण सापडण्याची शक्यता आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग वेगाने होत असला तरी तो डेल्टा व्हेरियंटपेक्षा प्रभावी नाही. यामुळे राज्यात आणि देशात संपूर्ण लॉकडाऊन न करता रात्रीची संचारबंदी, गर्दी न करणे, तसेच मर्यादीत बंधनांसह लॉकडाऊन लागू केल्यासही या ओमिक्रॉन रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होईल असे अग्रवाल यांनी म्हटलं आहे.

देशात ऑक्टोबर महिन्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी म्हटलं होते. कोरोनाचा नवा व्हेरियंट आल्यास ही लाट भयानक ठरण्याची चिन्हे होती परंतु नोव्हेंबर महिन्याच्या अखेरिस दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या प्रकरणांची नोंद झाली आहे. यानंतर आता भारतातही एकूण २३ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. हा व्हेरियंट भारतात पसरल्यास फेब्रुवारीमध्ये तिसरी लाट येईल असे संशोधकांकडून सांगण्यात येत आहे.


हेही वाचा : जगभरातील ४७ देशात ओमिक्रॉन व्हेरियंटचा धुमाकूळ, दक्षिण आफ्रिकेत रूग्णांचा आकडा ७०० पार

First Published on: December 7, 2021 11:12 AM
Exit mobile version