LAC वरील वाद मिटवण्यासाठी भारत -चीनमध्ये पुन्हा चर्चा; 11 मार्चला चर्चेचा 15 वा टप्पा

LAC वरील वाद मिटवण्यासाठी भारत -चीनमध्ये पुन्हा चर्चा; 11 मार्चला चर्चेचा 15 वा टप्पा

LAC वरील वाद मिटवण्यासाठी भारत -चीनमध्ये पुन्हा चर्चा; 11 मार्चला चर्चेचा 15 वा टप्पा

लडाखबाबत सुरु असलेल्या वादाच्या मुद्द्यावर भारत आणि चीनमध्ये पुन्हा एकदा चर्चा होणार आहे.11 मार्च रोजी दोन्ही देशांमधील लष्करी चर्चेचा 15 वा टप्पा होणार आहे. यात लडाख आणि एलएसीसंदर्भातील उर्वरित वादांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 12 जानेवारी रोजी कॉर्प्स कमांडर स्तरावर चर्चा पार पडली. मात्र त्या चर्चेतून कोणताही विशेष निर्णय घेणे शक्य झाले नाही. दरम्यान मे 2020 पासून सुरू झालेला तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूंनी स्वीकारार्ह तोडगा काढला जाईल, असे दोन्ही देशांनी निश्चितपणे सांगितले होते.

11 मार्च रोजी चुशूल मोलदो येथे भारत आणि चीन अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. एलएसीवरील फ्रिक्शन पॉइंट दोन वेळा संघर्ष झाल्यानंतरही, दोन्ही देशांकडून जोरदार सैन्य तैनात केले आहे. सुमारे 50 ते 60 हजार सैनिक गलवान, पॅंगॉन्ग आणि गोग्रा हाइट्ससह येथे तैनात आहेत.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘उर्वरित फ्रिक्शन परिसरात दोन्ही देश तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील. चीनकडून नुकताच आलेला प्रतिसाद सकारात्मक आहे. त्यालाही एका निष्कर्षाकडे वाटचाल करायची आहे असे दिसते.’ नुकत्याच झालेल्या चर्चेत, पेट्रोल पॉईंट 15 येथे विभक्त होण्याबाबत चर्चा झाली होती, जी नंतरही झाली.


 

First Published on: March 9, 2022 8:05 AM
Exit mobile version