Corona: ब्रिटनमधून भारतात इनकमिंग बंद, विमानसेवा स्थगित

Corona: ब्रिटनमधून भारतात इनकमिंग बंद, विमानसेवा स्थगित

ब्रिटनमध्ये सध्या नव्या कोरोना व्हायरसचा फैलाव अधिक होत आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रिटनहून भारतात येणारी विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. आज मध्यरात्रीपासून ही स्थगित लागू होणार आहे. ब्रिटनवरून येणाऱ्या विमानावर बंदी घालण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मागणी केली होती. यापूर्वी ब्रिटनमधली कोरोनाची परिस्थिती पाहून युरोपमधील अनेक देशांनी ब्रिटनहून येणारी विमानांवर बंदी घातली आहे.

ब्रिटनमधील सध्याची परिस्थिती पाहता भारत सरकारने निर्णय घेतला आहे की, ‘३१ डिसेंबर २०२० पर्यंत ब्रिटनहून भारतात येणारी सर्व उड्डाणे स्थगित केले असून आज मध्यरात्री १२ वाजल्यापासून ही स्थगिती लागू होईल. यापूर्वी येणाऱ्या प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे.’ दरम्यान ब्रिटनमधील या नव्या भयानक कोरोना व्हायरसमुळे पंतप्रधान बोरिस जोन्सन यांनी लंडनसहित दक्षिण-पूर्व अनेक भागात ३० डिसेंबरपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच अनेक निवासी भागात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

सध्या ब्रिटनमधील पसरलेल्या कोरोनाच्या नव्या व्हायरसबाबत भारत सरकार सतर्क असून घाबरून जाण्याची गरज नाही, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन म्हणाले. तसेच यासंदर्भात लवकरच आरोग्य मंत्रालय बैठक घेणार असल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा – ब्रिटनमधील नवा कोरोना व्हायरस नियंत्रणाबाहेर, विमानांवर बंदी


 

First Published on: December 21, 2020 3:36 PM
Exit mobile version