India corona update: कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात! देशात २४ तासांत २७,४०९ नव्या रुग्णांची नोंद, ३४७ जणांचा मृत्यू

India corona update: कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात! देशात २४ तासांत २७,४०९ नव्या रुग्णांची नोंद, ३४७ जणांचा मृत्यू

देशातील कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात येताना दिसत आहे. सलग तिसऱ्या दिवशी देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद ५० हजारांहून कमी झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत २७ हजार ४०९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ३४७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापूर्वी काल, सोमवारी देशात ३४ हजार ११३ नवे कोरोनाबाधित आढळले होते आणि ३४६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. कालच्या आकडेवारीच्या तुलनेत आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत ६ हजार ७०४ घट झाली असून एका मृत्यूची वाढ झाली आहे. तसेच २४ तासांत ८२ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत म्हणजेच ५५ हजाराने सक्रीय रुग्णात कमी झाली आहे. सध्या देशात ४ लाख २३ हजार १२७ सक्रीय रुग्ण आहेत.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या – ४ कोटी २६ लाख ९२ हजार ९४३
देशातील एकूण मृत्यूची संख्या – ५ लाख ०९ हजार ३५८
देशातील एकूण रुग्ण बरे झालेल्यांची संख्या – ४ कोटी १७ लाख ६० हजार ४५८
देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या – ४ लाख २३ हजार १२७
देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या – ७५ कोटी ३० लाख ३३ हजार ३०२
देशातील एकूण लसीकरण – १ अब्ज ७३ कोटी ४२ लाख ६२ हजार ४४०

महाराष्ट्रात रुग्णसंख्येत होतेय घट

ज्या महाराष्ट्रात दिवसाला ४०, ५० हजारांहून नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत होते, त्याच महाराष्ट्रात आता १ हजाराच्या घरात रुग्ण आढळत आहे. काल, सोमवारी महाराष्ट्रात १ हजार ९६६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आणि १२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर ११ हजार ४०८ जण कोरोनामुक्त झाले. सध्या महाराष्ट्रात ३६ हजार ४४७ सक्रीय रुग्ण आहेत.


हेही वाचा – Corbevax Vaccine: लवकरच १२ ते १८ वयोगटातील मुलांना मिळणार नवीन स्वदेशी कोरोना लस


 

First Published on: February 15, 2022 9:27 AM
Exit mobile version