घरताज्या घडामोडीCorbevax Vaccine: लवकरच १२ ते १८ वयोगटातील मुलांना मिळणार नवीन स्वदेशी कोरोना...

Corbevax Vaccine: लवकरच १२ ते १८ वयोगटातील मुलांना मिळणार नवीन स्वदेशी कोरोना लस

Subscribe

ही स्वदेशी लस काय आहे? कशी वापरली जाणार? याबाबत जाणून घ्या.

देशात १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लवकरच नवीन स्वदेशी कोरोना लस मिळण्याची शक्यता आहे. कारण ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या (DCGI) विषय तज्ज्ञ समितीने (SEC) काही अटींसह १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी बायोलॉजिकल ईद्वारे विकसित केलेली कॉर्बेवॅक्सचा (Corbevax) आपत्कालीन वापरासाठी शिफारस केली आहे. सरकारने अजूनही १५ पेक्षा कमी वयोगटातील मुलांना लस देण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही आहे. अलीकडेच नीति आयोगाचे सदस्य वी.के. पॉल यांनी एका पत्रकार परिषदेत लसीकरणाची अतिरिक्त गरज आणि लसीकरणासाठी लोकसंख्येचा समावेश यांचा सतत अभ्यास केला जात असल्याची सांगितले होते.

- Advertisement -

दरम्यान २८ डिसेंबरला प्रौढांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी कॉर्बेवॅक्सला डीसीजीआयकडून मंजूरी दिली होती. कोरोना विरोधातील भारताची पहिली स्वदेशी लस RBD प्रोटीन सब-युनिट लस आहे. अजूनपर्यंत देशातील लसीकरण मोहिमेचा या लसीचा समावेश करण्यात आला नाही. माहितीनुसार, कोरोनासंदर्भातील एसईसीच्या निवेदनावर विचार-विनिमय करत असतात काही अटींसह १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी बायोलॉजिकल ई कॉर्बेवॅक्सला मर्यादित आपत्कालीन वापर करण्यासाठी मंजूर करण्याची शिफारस केली आहे. अंतिम मंजुरीसाठी ही शिफारस डीसीजीआयकडे पाठवण्यात आली आहे. ९ फेब्रुवारी रोजी शिफारस करण्यासंदर्भातील अर्ज डीसीजीआयकडे पाठवण्यात आला होता. त्यामुळे आता लवकर १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी आपात्कालीन वापरासाठी कॉर्बेवॅक्स लसीचा मंजूरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सगळ्यात पहिल्यांदा कॉर्बेवॅक्स लस स्नायूद्वारे शरीरात टोचली जाईल. त्यानंतर २० दिवसांच्या आत दोन डोस घेतले जातील. दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानात कॉर्बेवॅक्स लस साठवली जाते.

- Advertisement -

हेही वाचा – Emergency In Canada: कोरोना निर्बंधांच्या विरोधातील आंदोलांमुळे कॅनडाच्या पंतप्रधानांचा मोठा निर्णय; आणीबाणी केली घोषित


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -