India Corona Update: देशात २४ तासांत नव्या रुग्णांसह मृत्यूच्या संख्येत घट; लसीकरणाचा टप्पा ४१ कोटी पार!

India Corona Update: देशात २४ तासांत नव्या रुग्णांसह मृत्यूच्या संख्येत घट; लसीकरणाचा टप्पा ४१ कोटी पार!

India Corona Update: देशात २४ तासांत नव्या रुग्णांसह मृत्यूच्या संख्येत घट; लसीकरणाचा टप्पा ४१ कोटी पार!

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. त्यामुळे रुग्णवाढीत देखील घट होत आहे. मात्र यादरम्यानच कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात येणार असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३० हजार ९३ नवे कोरोनाबाधित आढळले असून ३७४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४५ हजार २५४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी ११ लाख ७४ हजार ३२२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख १४ हजार ४८२ जणांचा मृत्यू झाला असून ३ कोटी ३ लाख ५३ हजार ७१० जण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या ४ लाख ६ हजार १३० जणांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात सध्या जोरदार लसीकरण मोहीम सुरू आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील लसीकरणाचा टप्पा ४१ कोटी पार झाला आहे. म्हणजेच आतापर्यंत ४१ कोटी १८ लाख ४६ हजार ४०१ जणांना लस देण्यात आली आहे.

आयसीएमआरच्या माहितीनुसार देशात १९ जुलैपर्यंत ४४ कोटी ७३ लाख ४१ हजार १३३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या. यापैकी काल दिवसभरात १७ लाख ९२ हजार ३३६ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १९ कोटी १७ लाख १२ हजारवर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ४१ लाख १२ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर १७ कोटी ४५ लाख ५६ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – डेल्टा व्हेरिएंटसंदर्भात WHO चा इशारा, जागतिक स्तरावर तयार होणार सर्वात महत्त्वाचा कोरोना स्ट्रेन!


First Published on: July 20, 2021 9:44 AM
Exit mobile version