India Corona Update: देशाच्या मृत्यूसंख्येत घट, तर ६२ ,४८० नव्या रुग्णांची नोंद

India Corona Update: देशाच्या मृत्यूसंख्येत घट, तर ६२ ,४८० नव्या रुग्णांची नोंद

जगभरात कोरोनाच सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये भारत देश तिसऱ्या क्रमांकावर होता. देशात बाधितांप्रमाणेच मृत्यूंची संख्याही वाढत होती. मात्र देशाच्या मृत्यूसंख्येत आता घट होत आहे. देशात गेल्या २४ तासात कोरोना मृत्यूच्या संख्येत मोठी घट झाल्याचे पहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासात १ हजार ५८७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेत आज कोरोना मृत्यूचा आकडा घटला आहे. काल हीच संख्या २ हजार ३३० इतकी होती. देशातील मृत्यूच्या घटत्या संख्येमुळे भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील बाधितांचा विचार केला असता देशात आज ६२ हजार ४८० नव्या बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल हीच संख्या ६७ हजार २०८ इतकी होती. देशात आतापर्यंत २ कोटी ९७ लाख ६२ हजार ७९३ कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (India Corona Update: Death toll in India drops to 62,480 new corona patirnts registared)


देशात कालच्या तुलनेत आजा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आज ८८ हजार ९७७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर काल हीच संख्या १ लाख ३ हजार ५७० इतकी होती. देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांचा विचार केला असता आतापर्यंत २ कोटी ८५ लाख ८० हजार ६४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशातील बाधित रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या कमी झाली असली तरी देशातील अँक्टिव्ह रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या ७३ दिवासांनी देशातील अँक्टिव्ह रुग्णांची संख्या ८ लाखांहून कमी झाली आहे. देशात सध्या ७ लाख ९८ हजार ६५६ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत २६ कोटी ८९ लाख ६० हजार ३९९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.


हेही वाचा – Covid-19 विरोधातील लढाई जिंकण्यासाठी Lancet दिले भारताला ८ सल्ले, जाणून घ्या

 

First Published on: June 18, 2021 10:34 AM
Exit mobile version