India Corona Update: ७१ दिवसांनी देशातील Active रुग्णांच्या संख्येत मोठी घट

India Corona Update: ७१ दिवसांनी देशातील Active रुग्णांच्या संख्येत मोठी घट

देशात कोरोना रुग्णांचा वेग मंदावतो आहे. कोरोना रुग्णांची संख्या ६० हजारांच्या घरात आली आहे. काल पर्यंत देशातील बाधितांची संख्या कमी झाली होती.आज मात्र पुन्हा बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचे पहायला मिळाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आज ६७ हजार २०८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल हीच संख्या ६२ हजार २२४ इतकी होती. देशातील बाधित रुग्णांची संख्या वाढली असली तरी देशातील अँक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत तब्बल ७१ दिवसांनी मोठी घट झाल्याचे पहायला मिळाले आहे. (India Corona Update: Large decline in the number of active corona patients in india after 71 days) देशात सध्या ८ लाख २६ हजार ७४० अँक्टिव्ह रुग्ण आहे. देशात बाधित रुग्णांसोबतच अँक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी होत असल्याने भारतीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे.


देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा विचार केला असता, देशात आज १ लाख ३ हजार ५७० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात करुन ते सुखरुप घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत २ कोटी ८४ लाख ९१ हजार ६७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. देशातील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तर गेल्या २४ तासात देशात २ हजार ३३० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल हीच संख्या २ हजार ५४२ इतकी होती. कालच्या तुलनेत आज देशात मृत्यूंच्या संख्येत २ हजारांनी घट झाल्याचे दिसून आले आहे. देशात आतापर्यंत ३ लाख ८१ हजार ९०३ रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेला चांगलाच वेग आला आहे. देशात सध्या कोव्हिशिल्ड,कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक व्ही या लसी देण्यात येत आहेत. देशात आतापर्यंत २६ कोटी ५५ लाख १९ हजार २५१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. देशात सध्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरु आहे. देशातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोना लसी देण्यात येत आहेत.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: मृतांच्या संख्येत मोठी घट; बाधितांचा आकडा मात्र काहीसा वाढला

 

 

First Published on: June 17, 2021 10:39 AM
Exit mobile version