Live Update : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देखील अशाच मोठ्या उत्साहात साजरी झाली पाहिजे- राज ठाकरे 

Live Update : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देखील अशाच मोठ्या उत्साहात साजरी झाली पाहिजे- राज ठाकरे 

Live update Mumbai Maharashtra

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देखील अशाच मोठ्या उत्साहात साजरी झाली पाहिजे- राज ठाकरे मशीदीवरील भोंगे सरकारला उतरावावेच लागतील नाही तर त्यांच्यासमोर हनुमान चालीसा लावू – राज ठाकरे मोदींना विनंती आहे राज्यात ईडी ज्याप्रकारे धाडी टाकतयं, त्याप्रकारे मुंबईतील मदरशांमध्ये धाडी टाका बघा काय काय बाहेर पडेल- राज ठाकरे जनतेची कमजोरी मंत्र्यांना सत्तेत आणतेय- राज ठाकरे मुंबईमधील बीएसटीचा रंग बदतोय- आमदार, खासदारांना देण्यात येणारे पेन्शन बंद केले पाहिजे, लोकांची काम करतायत ना? मग कशाला पाहिजे घरं – राज ठाकरे झोपडपट्ट्या दिवसेंदिवस वाढतायत, आमदारांना कसली घरं देताय?- राज ठाकरे ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली तो महाराष्ट्र आता जातीत अडकतोय- राज ठाकरे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यापासून जाती-पातीचे राजकारण सुरु झाले – राज ठाकरे हिंदू हा फक्त हिंदू- मुस्लीम दंगलीत हिंदू असतो-  राज ठाकरे अयोध्येत जाणार पण तारीख सांगत नाही- राज ठाकरे महाराष्ट्रातील नोकऱ्यांमध्ये मराठी माणसाला प्राधान्य दिले पाहिजे- राज ठाकरे सत्ताधारी जनतेला मेंढरासारखे वापरतायत- राज ठाकरे इतिहास विसरणाऱ्यांच्या पायाखालचा भूगोल निसटला आहे- राज ठाकरे वैभवशाली महाराष्ट्र आम्ही कुठे आणून ठेवला? – राज ठाकरे छगन भुजबळ स्वातंत्र्य सैनिक नव्हते- राज ठाकरे बॉम्ब ठेवण्याची हिंमत कशी होते? – राज ठाकरे सकाळी कॅमेरावाले आले की बकबक सुरु, राज ठाकरेंचा संजय राऊतांना टोला पळून कोणासोबत गेले, लग्न कोणासोबत केले, राज ठाकरे मविआ सरकारवर बरसले सकाळी उठून बघतोय तर काय जोडा वेगळाच – राज ठाकरे जनता विसरून जाते हे राजकारण्यांचे फायद्याचे ठरते- राज ठाकरे निलाकानंतर उद्धव ठाकरेंना अडीच वर्षानंतर साक्षात्कार – राज ठाकरे राज ठाकरेंकडून पोलिसांचे कौतुक राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते येत असल्याने कार्यक्रमाला उशीर  – राज ठाकरे
मुंबईत आज आज 49 नवे रुग्ण, 33 रुग्ण कोरोनामुक्त

राज ठाकरेंची थोड्याच वेळात जाहीर सभा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनसे सैनिक मुंबईत दाखल


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते झाले मुंबईमधील मेट्रोच्या 2 नवीन मार्गांचे उद्धाटन

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या

इंग्रजी शाळेमध्ये मराठी घरामध्ये बोलले पाहिजे – उद्धव ठाकरे

मराठी भाषा शाळेत शिकवली पाहिजे ही वेळ कोणी आणली मराठी भाषा बोलली पाहिजे इंग्रजी शाळेमध्ये मराठी घरामध्ये बोलले पाहिजे जास्तीत भाषा शिकणं हा गुन्हा नाही
मुंबईतील चर्नी रोड गिरगाव येथे उभारण्यात येत असलेल्या मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
वस्तू व सेवा करांच्या इमारतीच भूमिपूजन

भुजबळ फार्मवर यंदा पहिल्यांदाच गुढी पाडवा उत्सव

नाशिक येथील भुजबळ फार्म वर यंदा पहिल्यांदाच गुढी पाडवा उत्सव साजरा. भुजबळ आणि त्यांची नात ईश्वरी यांच्या हस्ते उभारली गुढी. संपूर्ण भुजबळ कुटुंबीय गुढी पाडव्याच्या उत्साहात सहभागी.

औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद जवळ मालगाडी रुळावरून घसरली, रेल्वे वाहतूक ठप्प

रेल्वे मालगाडी रेल्वे मार्गावरून घसरली. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद जवळ मालगाडी रुळावरून घसरली. मालगाडीचे ८ डब्बे रुळावरून घसरले. सकाळी सव्वासात वाजता घटना घडली. औरंगाबाद मनमाड मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प.

अनेकजण मनात सरकार पाडण्याच्या गुढ्या उभारतायत, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

महाविकास आघाडी कोसळणार अशई भाकितं करणाऱ्या भाजपला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुढीपाडव्याच्या निमित्ताने जोरदार टोला लगावला. अनेकजण मनात सरकार पाडण्याच्या गुढ्या उभारत आहेत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. यावेळी त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवर देखील भाष्य केलं. मुंबईतल्या वडाळा येथील ट्रक टर्मिनस येथे वस्तू व सेवा कर भवनाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन आज होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी बोलताना विरोधकांवर निशाणा साधला. “एक वातावरण तयार केलं जात आहे. सरकारमध्ये कुठे तरी रुसवे फुगवे सुरु आहेत, तसं काहीच नाही आहे पण आपण हे सरकार स्थापन केलं त्याचं नाव महाविकास आघाडी नाव ठेवलं आहे. महाविकास हा नुसता नावामध्ये नाही आहे, तो प्रत्यक्षात आपण जमिनीवर अंमलात आणतोय,” असं मुख्यमंत्री म्हणाले. अनेकदा घोषणा होता, नारळवाल्याचा खप जोरात होतो, अनेकवेळा अनेकजण नाराळ फोडतात, आणि त्या कोनशिला तशाच असतात. आजचं भूमिपूजन केवळ नारळ फोडण्यासाठी नाही आहे. काम आजपासून सुरु करतोय. आपण उदाहारण ठेवतोय सर्वांसमोर…त्यानंतर आपल्यामध्ये कटूता निर्माण व्हावी, यासाठी काहीजण मनातल्या मनात गुढ्या उभारत आहेत. कारण दुसरा उद्योग नाही आहे. त्यामुळे सरकार पडण्याच्या आणि पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारत असतात. त्यांना आपण आपल्या कृतीतून चोख उत्तर दिलं आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आमच्या कोणाच्या मनामध्ये भेदभाव नाही, असं स्पष्ट केलं. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, अशा कार्यक्रमांमध्ये राजकीय बोलू नये पण काही वेळा बोलल्या शिवाय गत्यंतर नाही. सध्या काही वातावरण निर्माण केलं जातंय, महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे. हे कारस्थान, षडयंत्र उघड उघड दिसतंय. त्या महाराष्ट्र द्वेष्ट्यांना सांगायचं आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेला महाराष्ट्र जो आधार देत आहे, महाराष्ट्र जो योगदान देतोय, ते योगदान जर बाजूला काढला तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागू शकतो. महाराष्ट्र हा प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहिला आहे. महाराष्ट्राला बदनाम करु नका, अस उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह, तब्बल २ वर्षानंतर नववर्षाचं जल्लोषात स्वागत,

नसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल यांचा मृत्यू

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल यांचा काल मृत्यू झाला. त्यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार काल त्यांचे चेंबूर येथील माहुल भागातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

First Published on: April 2, 2022 9:01 PM
Exit mobile version