Live Update: ममतादीदींनी मुख्यमंत्र्यांना दिला शुभसंदेश, आदित्य ठाकरे यांची माहिती

Live Update: ममतादीदींनी मुख्यमंत्र्यांना दिला शुभसंदेश, आदित्य ठाकरे यांची माहिती
ममतादीदींनी मुख्यमंत्र्यांना शुभसंदेश दिला असल्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.
मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या तीन नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे.
कोरोनाचा नवा व्हेरियंट हा ऑमिक्रॉनपेक्षाही अत्यंत धोकादायक असल्याचं WHO ने म्हटलं आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत दाखल झाल्या आहेत.
परमबीर सिंह सीआयडी कार्यालयात पोहोचले
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज सायंकाळी ५.३० वाजता मुंबईत दाखल होणार असून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना अटक करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान जाळपोळ आणि तोडफोड केल्याप्रकरणी रविकांत तुपकर यांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना किला कोर्टाने दिला दिलासा. परमबीर सिंह यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट कोर्टाने रद्द केले.
१२ खासदारांच्या निलंबनाविरोधात विरोधक नेत्यांनी संसदेच्या परिसरातील महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले.
१२ खासदारांचे निलंबन मागे घेण्यास सभागृहाचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी नकार दिल्यानंतर विरोधकांनी राज्यसभेतून सभात्याग केला.
मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह किला कोर्टात दाखल. फरार घोषित केल्याचे आदेश रद्द करण्यासाठी परमबीर सिंह कोर्टात दाखल.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट रद्द
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उद्या दुपारी ३ वाजता सिल्व्हर ओकवर शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांची महत्त्वाची बैठक, सकाळी १०.३० वाजता केंद्रीय आरोग्य सचिव देशातील सद्यस्थितीचा आढावा घेणार आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या अमरावतीमध्ये दाखल झाले आहेत. अमरावती रेल्वे स्टेशनवर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सध्या अमरावतीमध्ये पोलीसांचा कडेकोड बंदोबस्त आहे.
आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. काल राज्यसभेत १२ विरोधीपक्ष खासदारांना निलंबन करण्यात आले, या मुद्द्यावरून आज राज्यसभेत हंगामा होण्याची शक्यता आहे. तसेच लोकसभेचे कामकाज आज सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे.
तृणमूल अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने राज्यात पुढील ४ ते ५ दिवस पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
First Published on: November 30, 2021 4:09 PM
Exit mobile version