Live Update: राज्यात आज ३०१० एसटी कर्मचारी निलंबित, एकूण निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या ६२७७ वर

Live Update: राज्यात आज ३०१० एसटी कर्मचारी निलंबित, एकूण निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या ६२७७ वर
आज रोजी निलंबित – ३०१०,  एकूण निलंबित – ६२७७, सेवा समाप्त – २७०, एकूण सेवासमाप्त – १४९६, सेवासमाप्त नोटीस हजर – २४०
ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्र्याची महत्त्वपूर्ण बैठक
२९ डिसेंबरला संसद भवन परिसरातून निघणारा ट्रॅक्टर मार्च रद्द
खोतकरांनी १०० एकर शासकीय जागा बळकावली- किरीट सोमय्या
दक्षिण अफ्रिकेतून येणाऱ्या विमान उड्डाणांवर बंदी आणावी, देशात या व्हेरियंटचे रुग्ण आढळलेले नाहीत- राजेश टोपे
बंगळुरू-पाटणा ‘गो एअरवेज’च्या विमानाचं इमरजन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. तांत्रिक बिघाडामुळे नागपूर विमानतळावर सुखरुप लँडिंग केलं आहे. विमानात वैमानिकासह १३५ प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्वजण सुखरुप आहेत.
मुंबईतील कुर्ला येथील २० वर्षी तरुणीवर बलात्कार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. कुर्ला बंद परिसरात एचडीआयएल कंपाऊडमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला. याप्रकरणातील नराधमांना अटक करण्याचं आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीला झाली सुरुवात …सविस्तर वृत्त वाचा 
अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान सुरू असल्याचे नवाब मलिक पत्रकार परिषदेत म्हणाले. काल त्यांनी काही व्यक्तीचा फोटो शेअर करून ते आपल्यावर पाळत ठेवत असल्याचे सांगितले होते.
देशात गेल्या २४ तासांत ८ हजार ३१८ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ४६५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १० हजार ९६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या देशात १ लाख ७ हजार १९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोना आणि लसीकरणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी १०.३० वाजता अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणारा. नवा व्हेरियंट ओमीक्रॉनविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वेचा उद्या विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक असणार आहे. ठाणे-कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. मुलूंडहून सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४६ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या/अर्ध जलद सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. मेगाब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
राज्यात २९ नोव्हेंबर आणि ३० नोव्हेंबरला पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, कोकणासह मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा शक्यता आहे. यादरम्यान जोरदार वारे वाहण्याचा देखील अंदाज आहे.
First Published on: November 27, 2021 9:01 PM
Exit mobile version