घरताज्या घडामोडीनवा व्हेरियंट Omicron धोकायदायक असल्याच्या WHOच्या घोषणेनंतर जग चिंतेत; थोड्याच वेळात पंतप्रधान...

नवा व्हेरियंट Omicron धोकायदायक असल्याच्या WHOच्या घोषणेनंतर जग चिंतेत; थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी घेणार बैठक

Subscribe

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या कोरोनाच्या व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा जगात दहशत पसरली आहे. हा नवा व्हेरियंट अधिक धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. काल, शुक्रवारी जागतिक आरोग्य संघटनेने दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या व्हेरियंटला B.1.1.529 या ओमिक्रॉन (Omicron) नाव दिले. तसेच हा व्हेरियंट सर्वाधिक वेगाने पसरणार असून चिंताजनक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. त्यामुळे आता सर्व देश सतर्क झाले आहेत. या सर्व परिस्थिती दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. कोरोनाची सध्याची परिस्थिती आणि लसीकरणासंदर्भात आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत मोदींची बैठक पार पडणार आहे.

माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोरोना संदर्भातील बैठक आज सकाळी १०.३० वाजता होणार आहे. दरम्यान या बैठकीमध्ये नवा व्हेरियंट ओमिक्रॉन बद्दल चर्चा होण्याची देखील शक्यता आहे. देशात सध्या काही राज्यांनी शाळा-कॉलेज सुरू केले आहेत. पण शाळा-कॉलेजमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, ओडिशासह इतर राज्यातील विद्यार्थी आणि शिक्षक कोरोनाचे शिकार होत आहे.

- Advertisement -

तसेच आता कोरोना नव्या व्हेरियंटमुळे जगातील देशांची चिंता वाढली आहे. अमेरिकासह काही देशांनी आंतरराष्ट्रीय विमान, खासकरून दक्षिण आफ्रिकाहून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. भारत देखील आंतरराष्ट्रीय उड्डाण आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. एक दिवसापूर्वी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने जवळपास एक वर्षापासून ठप्प असलेल्या आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा १५ डिसेंबरपासून सुरू करण्याची घोषणा केली होती. पण आता या नव्या व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू होतो की काय? अशी भीती पसरली आहे.

- Advertisement -

हेही वाचा  – कोरोनामुळे New York ‘ऑउट ऑफ कंट्रोल’; राज्यपालांनी ‘Disaster Emergency’ केली घोषित


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -