India Corona Update: देशात ५० दिवसांत आज नव्या रुग्णसंख्येत सर्वाधिक घट

India Corona Update: देशात ५० दिवसांत आज नव्या रुग्णसंख्येत सर्वाधिक घट

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. देशात ५० दिवसांत नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत सर्वाधिक घट झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात १ लाख ५२ हजार ७३४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३ हजार १२८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २ लाख ३८ हजार २२ जण बरे होऊन घरी गेले आहेत. आता देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २ कोटी ८० लाख ४७ हजार ५३४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख ३९ हजार १०० जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ५६ लाख ९२ हजार ३४२ जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या देशात २० लाख २६ हजार ९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २१ कोटी ३१ लाख ५४ हजार १२९ जणांचा लसीकरण पार पडले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील ५० दिवसांतील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आज सर्वाधिक घट झाली आहे. गेल्या २४ तासांत ८८ हजार ४१६ केसेस कमी झाल्यानंतर सक्रीय रुग्णांची संख्या २० लाख २६ हजार ९२वर पोहोचली आहे. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण वाढून ९१.६० टक्क्यांवर गेले आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर ९.०४ टक्के आणि दैनंदिन पॉझिटिव्हीटीचा दर ९.०७ टक्के झाला आहे, जो सातत्याने ७ दिवसांत १० टक्के कमी झाला आहे.

देशात ३० मे पर्यंत ३४ कोटी ४८ लाख ६६ हजार ८८३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल दिवसभरात १६ लाख ८३ हजार १३५ नमुन्याच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


हेही वाचा – Corona Vaccination: जगभरात लसीकरणाचा ट्रेंड सेंटर होणार भारत; जाणून घ्या ‘Mix and Match’


 

First Published on: May 31, 2021 10:16 AM
Exit mobile version