घरताज्या घडामोडीCorona Vaccination: जगभरात लसीकरणाचा ट्रेंड सेंटर होणार भारत; जाणून घ्या 'Mix and...

Corona Vaccination: जगभरात लसीकरणाचा ट्रेंड सेंटर होणार भारत; जाणून घ्या ‘Mix and Match’ व्यवस्था

Subscribe

देशात येत्या काळात लसीकरण मोहीमेत मोठा बदल घडू शकतो. हा मोठा बदल कोणत्याही कारणामुळे होणार नसून सध्या आपण अनेकांना वेगवेगळ्या लसीचे डोस दिले गेलेल्या घटना पाहिल्या आहेत. त्याच अनुषंगाने हा बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे आता वैज्ञानिक येत्या काळात लोकांना ‘मिक्स अँड मॅच’ लसीचा डोस दिला जावा, यासाठी संशोधन करत आहेत. ‘मिक्स अँड मॅच’ लसीचा डोस म्हणजे पहिल्या लसीचा डोस एका कंपनीचा आणि दुसऱ्या लसीचा डोस दुसऱ्या कंपनीचा देणे. आता संशोधन केल्यानंतर येणारे परिणाम लक्षात घेऊन ‘मिक्स अँड मॅच’लसीचा डोस देण्याची ही व्यवस्था देशभरात लागू केली जाणार आहे.

देशातील लसीकरणाच्या व्यवस्थेवर नजर ठेवणारी कमेटीचे एक वरिष्ठ सदस्यांनी सांगितले की, ‘अनेक वेळा असे पाहिले गेले आहे की, लोकांना वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसीचे डोस दिल्यामुळे त्यांच्यात मजबूतपणा आणि आजाराशी लढण्यासाठीची क्षमता जास्त वाढली जाते. कारण अलीकडच्या दिवसात देशात काही राज्यांमध्ये अशाप्रकारच्या घटना घडल्याचे समोर आले आहेत.’

- Advertisement -

या घटना दुर्लक्षपणामुळे घडल्या असल्या तरी याचा साईड इफेक्ट झाल्याचे पाहायला मिळाले नाही आहे, असे वैज्ञानिकांनी सांगितले. वरिष्ठ वैज्ञानिकांनी सांगितले की, ‘येत्या काळात देशात ‘मिक्स अँड मॅच’ लसीचा अभ्यास केला जाईल. जास्तीत लोकांमध्ये मजबूत प्रतिकारशक्ती वाढवणे हा आमचा उद्देश आहे. यामुळे सातत्याने संशोधन सुरू आहे. हा त्याचाच एक भाग असेल.’

दरम्यान कोविड-१९ टास्क फोर्स कमेठीच्या वरिष्ठ सदस्यांनी सांगितले की, ‘दोन वेगवेगळ्या कंपनीची लस देणे म्हणजे इंटरचेंजबिलिटी होते. अशाप्रकारे लसीकरण करण्याची तयार झाली असून, लवकरच यावर शोध केला जाईल. यासाठी दोन वेगळवेगळ्या वर्गांचे विभाजन केले जाईल आणि त्यानंतर त्याचे परिणाम काय होतात हे पाहिले जाईल. सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेत बुहतेक वेळा असे दिसून आले आहे की, वेगवेगळ्या कंपन्यांचे डोस दिल्यास व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचे साईड-इफेक्ट होत नाही आहेत. जर हे संशोधन यशस्वी झाल्यास देशभरात ‘मिक्स अँड मॅच’ व्यवस्था सुरू केली जाईल.

- Advertisement -

हेही वाचा –Corona Vaccination: जुलैच्या अखेरीस २५ कोटी तर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ३० कोटी डोस खरेदी करण्याचे मोदी सरकारचे लक्ष्य 


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -