India Corona Update: देशात ४५ दिवसांत सर्वात कमी रुग्णांची नोंद

India Corona Update: देशात ४५ दिवसांत सर्वात कमी रुग्णांची नोंद

देशाला मोठा दिलासा मिळाला आहे. देशात ४५ दिवसांमध्ये सर्वात कमी कोरोना रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. गेली काही दिवस देशातील रुग्णसंख्येचा आलेख कमी होताना दिसत आहे. गेल्या २४ तासात देशात १ लाख ६५ हजार ५५३ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या ४५ दिवसांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. काल हीच रुग्णसंख्या १ लाख ७३ हजारांहून अधिक होती. देशात आजही बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. देशात आज २ लाख ७६ हजार ३०९ रुग्णांनी कोरोनावर मात करुन ते सुखरुपणे घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाची लढाई यशस्वीरित्या पार करुन बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही २ कोटी ५४ लाख ५४ हजार ३२० इतकी आहे. (India Corona Update: lowest number of corona patients in India in 45 days)


देशात कालच्या तुलनेत आज मृतांचा आकडाही काहीसा कमी झालेला दिसून आला आहे. देशात गेल्या २४ तासात ३ हजार ४६० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल हीच संख्या ३ हजार ६१७ इतकी होती. देशात आतापर्यंत ३ लाख २५ हजार ९७२ रुग्णांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. देशातील रुग्णसंख्या कमी होत असली तरीही सध्या देशात २१ लाख १४ हजार ५०८ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. देशात सध्या कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड आणि नव्याने आप्तकालीन वापरासाठी मंजुरी मिळालेली रशियाची स्पुटनिक लस देण्यात येत आहे. देशात आतापर्यंत २१ कोटी २० लाख ६६ हजार ६१४ नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले आहे. कोरोना काळात आई वडिलांचा मृत्यू झालेल्या अनाथ मुलांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना काळात आई वडिला गमावलेल्या मुलांना पीएम केअर फॉर चिल्ड्रेन अंतर्गत मदत केली जाणार आहे. त्याचबरोबर त्यांचे शिक्षणही मोफत केले जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.


हेही वाचा – कोरोनाने कमावती व्यक्ती गमावलेल्या कुटूंबियांना मोदी सरकार देणार पेंशन

First Published on: May 30, 2021 1:22 PM
Exit mobile version