चिंताजनक! देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला १५ लाखांचा टप्पा!

चिंताजनक! देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला १५ लाखांचा टप्पा!

चिंताजनक! देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला १५ लाखांचा टप्पा!

भारतातील कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. यामुळे भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येने १५ लाखांचा टप्पा पार केला आहे. ताज्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत १५ लाख ९८८ जण कोरोनाबाधित झाले आहेत. यापैकी आतापर्यंत ९ लाख ६१ हजार २१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ३३ हजार ६२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या ५ लाख ६ हजार १५३ जणांवर उपचार सुरू आहेत.

देशात महाराष्ट्र आणि तामिळनाडू राज्यात कोरोनाबाधितांची रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाखांहून अधिक आहे. आज तामिळनाडूत ६ हजार ९७२ कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळले असून ८८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे तामिळनाडूतील कोरोनाबाधितांची संख्या २ लाख २७ हजार ६८८वर पोहोचली आहे. राजधानी चेन्नईत आज १ हजार १०७ कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळले असून येथील कोरोनाबाधितांची संख्या ९६ हजार ४३८वर पोहोचली आहे.

सध्या तामिळनाडूत ५७ हजार ७३ रुग्णांवर उपचार सुरू असून १ लाख ६६ हजार ९५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत तामिळनाडूत ३ हजार ६५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान केरळमध्ये आज १ हजार १६७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत गेल्या २४ तासांत १ हजार ५६ कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळले असून दिल्ली बाधितांची संख्या १ लाख ३२ हजार २७५वर पोहोचली आहे.


हेही वाचा – ४७ चीनी Appsवरील बंदीमुळे ड्रॅगन भडकला; म्हणाला, भारताने चूक सुधारली पाहिजे


 

First Published on: July 28, 2020 7:40 PM
Exit mobile version