घरताज्या घडामोडी४७ चीनी Appsवरील बंदीमुळे ड्रॅगन भडकला; म्हणाला, भारताने चूक सुधारली पाहिजे

४७ चीनी Appsवरील बंदीमुळे ड्रॅगन भडकला; म्हणाला, भारताने चूक सुधारली पाहिजे

Subscribe

भारताच्या चीनी Appsच्या क्लोन बंदीच्या निर्णयाबाबत चीनने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मंगळवारी चीनने म्हटले की, ‘चीनी कंपन्यांचे मूलभूत अधिकार आणि हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील.’ भारत सरकारने २९ जूनला वीचॅट समवेत ५९ Appsवर बंदी घातली होती. परंतु काही Appsचे क्लोन सुरू होते. भारताने आता यावरही बंदी घातली आहे.

चीनी दूतावासाचे प्रवक्त जी. रोंग यांनी निवेदनात म्हटले आहे की, ‘भारताच्या या निर्णयामुळे चिनी कंपन्यांच्या मूलभूत अधिकारांचे आणि हिताचे नुकसान झाले आहे.’ पुढे चीनी प्रवक्त्यांनी सांगितले की, ‘भारतातील चीनी व्यापारांसह बाजाराच्या तत्वांनुसार परदेशी गुंतवणूकदारांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही भारत सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे चीनीने भारताला आपल्या चुका सुधारण्यास सांगितले आहे.’

- Advertisement -

लडाखमध्ये सुरू असलेल्या भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमवीर भारताने चीन विरोधात अनेक आर्थिक पावले उचलली आहेत. ज्यामध्ये चीनी Apps आणि क्लोनवर बंदी घालण्याने याचा देखील समावेश आहे. दरम्यान चीनी प्रवक्त्यांच्या या वक्तव्यावर अजून भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे.

चीनी प्रवक्ते म्हणाले की, ‘चीनी सरकारने नेहमीच आंतरराष्ट्रीय उद्योजकांना आंतरराष्ट्रीय नियम आणि स्थानिक नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. दरम्यान चीन आणि भारत या देशांमधील व्यावहारिक सहकार्य या दोन्ही देशांसाठी फायदेशीर आहे. जाणीवपूर्वी सहकार्यामध्ये अडथळा आणणल्यास भारताच्या हिताचेही काम होणार नाही. दरम्यान चीन आपल्या कंपन्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती पावले उचलली.’

- Advertisement -

२९ जून रोजी भारत सरकारने चीन Appsवर बंदी घातली होती तरी देखील भारतीय युजर्स वीचॅट वापर करत होते. पण याच आठवड्यात वीचॅट युजर्सना स्थानिक निर्बंधांमुळे ही सेवा उपबल्ध नसल्याचे संदेश येऊ लागले. सोमवारी भारत सरकारने आणखी ४७ Appsवर बंदी जाहीर केली. त्यामधील अनेक Apps हे जून महिन्यांत बंदी घातलेल्या Appsचे क्लोन आहेत. आतापर्यंत भारताने चीनच्या १०६ मोबाइल Appsवर बंदी घातली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -