India crosses 1 billion Covid vaccination: लवकरच सर्वजण मिळून कोरोनाला हरवुयात- PM Modi

India crosses 1 billion Covid vaccination: लवकरच सर्वजण मिळून कोरोनाला हरवुयात- PM Modi

farm laws: गुरु पर्व का तोहफा ! कृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदींनी निवडला गुरुनानक जयंतीचा दिवस

कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केले गेलेले कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा आकडा १०० कोटी पार गेला आहे. आज भारताने नवा विक्रम रचला असून हा ऐतिहासिक सर्व देशभरात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात पोहोचले होते. यावेळीस केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया देखील उपस्थितीत होते. यानंतर त्यांनी हरयाणाच्या झज्जर येथील एम्स कॅम्पसमध्ये इन्फोसिस फाउंडेशन सदन सुरू केले. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचं कौतुक करून आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘२१ ऑक्टोबर २०२१ या दिवसाची इतिहासात नोंद ठेवली जाईल. १०० कोटी डोस देऊन भारतने ऐतिहासिक कामिगिरी केली आहे. १०० वर्षात आलेली सर्वात मोठी महामारीसोबत लढण्यासाठी देशाकडे १०० कोटी डोसचे सुरक्षा कवच आहे. आता आपल्या सर्वजणांना एकत्र मिळून कोरोनाला हरवायाचे आहे.’ यानिमित्ताने मोदींनी प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज बनवण्यावर जोर दिला आहे. तसेच कॅन्सरवरील जवळपास ४०० औषधांचे दर मोदी सरकारने कमी केल्याचे ते म्हणाले.

याशिवाय रुग्णांना डॉक्टरांकडे दाखवण्यात कोणतीही समस्या येऊ नये यासाठी मोदी सरकार लक्ष्य देत आहे. इन्फोसिस फाउंडेशनचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, ‘ही संस्था सेवाभावाने काम करत आहे. सेवेची कोणतीही संधी हातून जाऊ देऊ नये. तसेची ई-संजीवनीची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय या भागात अधिक काम केले जात आहे. समाजाच्या सामर्थ्याने आपण हे लक्ष्य लवकरच साध्य करू शकू.’


हेही वाचा – Corona Vaccination in India: भारताचा नवा विक्रम! १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला


 

First Published on: October 21, 2021 12:18 PM
Exit mobile version