जागतिक श्रीमंतीत भारताचा षटकार !

जागतिक श्रीमंतीत भारताचा षटकार !

चीनी नागरिक सर्वाधिक कर्जबाजारी, पाकिस्तानची अवस्था बिकट, भारतापेक्षा बांग्लादेश सरस

भारत हा गरीब देश, असे म्हटले जात असले तरी ती वस्तुस्थिती राहिलेली नाही. भारताने श्रीमंतीकडे यशस्वी वाटचाल केली असून, तो जगातील सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत देश ठरला आहे. भारताची एकूण संपत्ती ८,२३० अब्ज अमेरिकन डॉलर्स नोंदवण्यात आली आहे. तर अमेरिका हा जगातला सर्वात श्रीमंत देश ठरला आहे.

अमेरिका प्रथम, चीन दुसरे तर जपानचा तीसरा क्रमांक
आफ्रो-आशिया बँकेच्या जागतिक संपत्ती स्थलांतरण अहवालात अमेरिका हा जगातील सर्वात श्रीमंत देश ठरला आहे. अमेरिकेची एकूण संपत्ती ६२, ५८४ अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे. दुसऱ्या क्रमांकावर चीन असून त्याची संपत्ती २४,८०३ अमेरिकन डॉलर्स आहे. तर तिसरे स्थान जपानने पटकावले असून, त्याची संपत्ती १९,५२२ अब्ज डॉलर्स आहे.

लोकसंख्येमुळे लाभ
देशाची एकूण संपत्ती ही त्या देशात राहणाऱ्या व्यक्तीची स्वत:ची संपत्ती, जसे मालमत्ता, रोख, समभाग, व्यवसाय संबंध, यावरून निश्चिती करण्यात आली आहे. आम्ही सरकारचा निधी त्यातून वगळला आहे. मोठ्या देशांचा त्यांच्या जास्त लोकसंख्येमुळे लाभ झालेला आहे.

जगातील सर्वात श्रीमंत १० देशांच्या यादीत इंग्लंड (९,९१९ अब्ज डॉलर्स), जर्मनी (९,६६० अब्ज डॉलर्स), भारत (८,२३० अब्ज डॉलर्स), ऑस्ट्रेलिया (६,१४२ अब्ज डॉलर्स), कॅनडा (६,३९३ अब्ज डॉलर्स), फ्रान्स (६,६४९ अब्ज डॉलर्स ) आणि इटली (४,२७६ अब्ज डॉलर्स) यांचा समावेश आहे.

भारताच्या संपत्तीत २०० टक्क्यांनी वाढ
भारतातील एन्टरप्रेन्युरची मोठी संख्या, चांगली शिक्षण प्रणाली, माहिती-तंत्रज्ञानातील प्रगती, वाढलेला व्यापार, रियल इस्टेट, आरोग्य, मीडिया सेक्टर यामुळे भारताच्या संपत्तीत गेल्या १० वर्षांत २०० टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

भारताची वाढलेली संपत्ती ही देशातील श्रीमंत व्यक्तींच्या प्रमाणात झालेल्या वाढीमुळे आहे. मागील दशकापासून भारताच्या श्रीमंत नागरिकांमध्ये सुमारे ३५ टक्क्यांची वाढ झालेली आहे. तसेच जागतिकीकरणानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे भारतीय नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे.

भविष्यात चीन आणि अमेरिकेच्या संपत्तीत मोठी वाढ होणार
आगामी दशकात चीनच्या संपत्तीत मोठी वाढ होणार असल्याचे सांगितले जाते. चीनची संपत्ती २०२७ साली ६९,४४९ अब्ज डॉलर्स होईल. तर अमेरिकेची संपत्ती त्याच काळात ७५,१०१ अब्ज डॉलर्स होईल.

First Published on: May 21, 2018 10:26 AM
Exit mobile version