Corona: देशात २४ तासांत ६१ हजार ४०८ नवे रुग्ण; मृत्यूचा आकडा ५७ हजार पार!

Corona: देशात २४ तासांत ६१ हजार ४०८ नवे रुग्ण; मृत्यूचा आकडा ५७ हजार पार!

Corona: देशात कोरोनाचा उद्रेक! आजची आकडेवारी धडकी भरवणारी

भारतात गेल्या २४ तासांत ६१ हजार ४०८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, कोरोनामुळे ८३६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३१ लाख ६ हजार ३४९ वर पोहचला आहे. दरम्यान, एका दिवसात ५७ हजार ४६८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत २३ लाख ३८ हजार ३६ हजार जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत देण्यात आली आहे.

जगात २ कोटीहून अधिक जणांना कोरोनाची बाधा

जगभर पसरणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असून सध्या जगात २ कोटी ३५ लाख ८४ हजार २५९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत ८ लाख १२ हजार ५१७ जणांना कोरोनाचीबाधा झाली आहे. तर आतापर्यंत १ कोटी २ लाख ८२ हजार १०४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्याचप्रमाणे सध्या ६ कोटी ६८ लाख ९ हजार ६३८ Active रुग्ण आहेत.


हेही वाचा – Corona Vaccine: रशियानंतर चीननं शोधली लस, आपत्कालीन स्थितीत लसीला मंजुरी


First Published on: August 24, 2020 9:48 AM
Exit mobile version