Coronavirus Cases Today: देशात २४ तासांत १६,७६४ नव्या कोरोनाबाधितांची वाढ; एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या १,२७०वर!

Coronavirus Cases Today: देशात २४ तासांत १६,७६४ नव्या कोरोनाबाधितांची वाढ; एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या १,२७०वर!

Guidelines for Home isolation : होम क्वारंटाईनबाबत केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स जारी; काय आहेत सूचना?

देशात जीवघेण्या कोरोनाच्या केसेस पुन्हा एकदा वाढवण्यास सुरुवात झाली आहे. तसेच कोरोनाचा सर्वात वेगाने पसरणारा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचे रुग्ण देखील झपाट्याने वाढत आहे. देशात गेल्या २४ तासांत १६ हजार ७६४ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून २२० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहेत. तर ७ हजार ५८५ रुग्ण रिकव्हर झाले आहेत. सध्या देशात ९१ हजार ३६१ सक्रिय रुग्ण असून रिकव्हरी रेट ९८.३६ टक्के आहे. देशातील १३ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा प्रसार झाला आहे. आतापर्यंत देशात १,२७० ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत.

देशातील वाढत्या कोरोना आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या केसेसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक राज्यांनी पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीत वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी यलो अलर्ट जारी केला. आता महाराष्ट्राने देखील कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र सरकारने वाढत्या कोरोना आणि ओमिक्रॉनचा प्रादुर्भावमुळे आज मध्यरात्रीपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. गर्दी टाळण्यासाठी सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळ्यांना फक्त ५० लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी दिली आहे. तसेच अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना उपस्थितीत राहण्याची मुभा दिली आहे.

महाराष्ट्र, दिल्ली, केरळ या तिन्ही राज्यांमध्ये ओमिक्रॉनची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. महाराष्ट्रात गुरुवारी दिवसभरात १९७ नव्या ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली. त्यापैकी १९० ओमिक्रॉनबाधित रुग्ण एकट्या मुंबईत आढळले आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्रभरात पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले आहे.

देशातील ओमिक्रॉनची स्थिती?

महाराष्ट्र – ४५० रुग्ण – १२५ रुग्ण रिकव्हर
दिल्ली – ३२० रुग्ण – ५७ रुग्ण रिकव्हर
केरळ – १०९ रुग्ण – १ रुग्ण रिकव्हर
गुजरात – ९७ रुग्ण – ४२ रुग्ण रिकव्हर
राजस्थान – ६९ रुग्ण – ४७ रुग्ण रिकव्हर
तेलंगणा – ६२ रुग्ण – १८ रुग्ण रिकव्हर
तामिळनाडू – ४६ रुग्ण – २९ रुग्ण रिकव्हर
कर्नाटक – ३४ रुग्ण – १८ रुग्ण रिकव्हर
आंध्र प्रदेश – १६ रुग्ण – १ रुग्ण रिकव्हर
हरयाणा – १४ रुग्ण – ११ रुग्ण रिकव्हर
ओडिसा – १४ रुग्ण – १ रुग्ण रिकव्हर
पश्चिम बंगाल – ११ रुग्ण – १ रुग्ण रिकव्हर
मध्यप्रदेश – ९ रुग्ण – ९ रुग्ण रिकव्हर
उत्तराखंड – ४ रुग्ण – ४ रुग्ण रिकव्हर
चंदीगढ – ३ रुग्ण – २ रुग्ण रिकव्हर
जम्मू-काश्मीर – ३ रुग्ण – ३ रुग्ण रिकव्हर
अंदमान आणि निकोबार – २ रुग्ण
उत्तर प्रदेश – २ रुग्ण – २ रुग्ण रिकव्हर
गोवा – १ रुग्ण
हिमाचल प्रदेश – १ रुग्ण – १ रुग्ण रिकव्हर
लडाख – १ रुग्ण – १ रुग्ण रिकव्हर
मणिपूर – १ रुग्ण
पंजाब – १ रुग्ण – १ रुग्ण रिकव्हर

First Published on: December 31, 2021 10:44 AM
Exit mobile version