Corona Update: भारतात कोरोनाने गाठला ३ लाख मृत्यूंचा आकडा, जगात भारत तिसऱ्या स्थानी

Corona Update: भारतात कोरोनाने गाठला ३ लाख मृत्यूंचा आकडा, जगात भारत तिसऱ्या स्थानी

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन आणि कडक निर्बधांमुळे कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे. मात्र मृतांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत असल्याने देशाच्या चिंतेत पुन्हा वाढ झाली आहे. देशात रविवारी दिवसभरात २,४०,८४२ नवे रूग्ण आढळून आले तर ३ हजार ७४१ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. रविवारच्या तुलनेत सोमवारी गेल्या २४ तासात कोरोना बाधितांचा आकडा घसरून तो २ लाख २२ हजार ३१५ वर पोहोचला आहे. परंतु चिंताजनक म्हणजे २४ तासात ४ हजार ४५४ रुग्णांनी जीव गमावल्यानंतर कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा वाढून ३,०३,७२० वर पोहोचला आहे. त्यामुळे आतापर्यंत भारतातील एकूण कोरोनाबळींनी ३ लाखांचा टप्पा पार केला असून भारत हा देश जगात तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.यानंतर अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारत तिसरा असा देशा ठरला आहे, ज्या ठिकाणी कोरोनामुळे ३ लाखाहून अधिकांनी आपला जीव गमावला आहे.

देशातील कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात नियंत्रणात येत आहे. मात्र, रुग्णांचा मृत्यूदर कमी होताना दिसत नाही. देशभरातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा ३ लाखाहून अधिक झाला आहे. २४ तासात ४ हजार ४५४ रुग्णांनी जीव गमावल्यानंतर कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा वाढून ३,०३,७२० वर पोहोचला आहे. यानंतर अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारत तिसरा असा देशा ठरला आहे, ज्या ठिकाणी कोरोनामुळे ३ लाखाहून अधिकांनी आपला जीव गमावला आहे.

देशात रविवारी करण्यात आलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येशी तुलना करता गेल्या २४ तासात कोरोना बाधितांचा आकडा घटला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात २४ तासांत २ लाख २२ हजारांहून अधिक नवे कोरोना रूग्ण आढळले असून एका दिवसात ४ हजार ४५४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३ लाख ३ हजार ५४४ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दिवसभरात २,२२,३१५ नवे रूग्ण आढळल्याने भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २ कोटी ६७ लाख ५२ हजार ४४७ झाला आहे. देशात २ कोटी ३७ लाख २८ हजार ०११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ३ लाख ३ हजार ७२० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे सक्रिय रूग्ण कमी होत आहेत दिवसभरात सध्या २७ लाख २० हजार ७१६ इतके सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. यासह आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या १९ कोटी ६० लाख ५१ हजार ९६२ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

First Published on: May 24, 2021 9:59 AM
Exit mobile version