India Corona Update: देशातील नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, एका दिवसात ५४६ कोरोनाबळी

India Corona Update: देशातील नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, एका दिवसात ५४६ कोरोनाबळी

Coronavirus : कोरोना महमारीने भारतीयांचे आयुर्मान दोन वर्षांनी घटले, IIPS चा अहवाल

देशात एकीकडे पावसाने हाहा:कार उडवून दिला असताना दुसरीकडे मात्र कोरोना रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे देशासमोरील चिंतेत अधिक भर पडली आहे. गेल्या २४ तासांत देशातील नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत तब्बल ४ हजारांची वाढ झाली आहे, तर मृतांचा आकडाही वाढला आहे. यात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही ३ हजारांची वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात ३९ हजार ०९७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर कालच्या तुलनेत ही संख्या ४ हजारांनी अधिक आहे. त्यामुळे ३० हजारांची पातळी गाठणारी रुग्णसंख्या पुन्हा ४० हजारांवर पोहचत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे देशात तिसरी लाट निर्माण होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. काल दिवसभरात देशात ५४९ कोरोना नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ३५ हजार ८७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ३ कोटी १३ लाख ३२ हजार १५९ वर पोहचला आहे. तर आत्तापर्यंत ३ कोटी ५ लाख ३ हजार १६६ नागरिक कोरोनातून बरे झाले आहेत. याचबरोबर ४ लाख २० हजार १६ रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. देशात सध्या ४ लाख ८ हजार ९७७ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात किंवा घरातच उपचार सुरु आहेत. याशिवाय आत्तापर्यंत ४२ कोटी ७८ लाख ८२ हजार २६१ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


Tokyo Olympics : भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूची रौप्य कमाई 


 

First Published on: July 24, 2021 12:55 PM
Exit mobile version