India Corona Update: दिलासा! गेल्या २४ तासात Active रूग्णांमध्ये घट तर Recovery Rate वाढून ९७.१८ टक्क्यांवर

India Corona Update: दिलासा! गेल्या २४ तासात Active रूग्णांमध्ये घट तर Recovery Rate वाढून ९७.१८ टक्क्यांवर

देशात कोरोना बाधितांची आकडेवारी कमी-अधिक होताना दिसतेय. मिळालेल्या माहितीनुसार, देशात मंगळवारी ३४ हजार ७०३ जणांना कोरोनाची लागण झाली तर ५५३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर आज बुधवारी देशात कोरोना बाधितांचा आकडा वाढून गेल्या २४ तासात ४३ हजाराहून अधिक नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. यासह ४७ हजार २४० जणांनी कोरोनावर मात केली असून ९३० जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे आतापर्यंत सक्रिय रूग्णांची संख्या कमी होऊन ४ लाख ५९ ९४० इतकी झाली आहे. तर देशाचा रिकव्हरी रेट हा ९७. १८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

आज देशात गेल्या २४ तासात ४३ हजार ७३३ जणांना कोरोनाची लागण झाली तर ९३० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यासह दिलासादायक बाब म्हणजे देशात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आज ४७ हजार २४० वर पोहचली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात ४३ हजारांहून अधिक बाधित आढळ्याने देशातील एकूण बाधितांचा आकडा हा ३ कोटी ६ लाख ६३ हजार ६६५ झाला आहे. तर आजपर्यंत २ कोटी ९७ लाख ९९ हजारांहून अधिक रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णंची संख्या ४ लाख ५९ हजार ९२० इतकी झाली आहे. तर, आजपर्यंत देशात ४ लाख ४ हजार २११ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय देशभरात आजपर्यंत ३६ कोटी १३ लाख २३ हजार ५४८ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

आतापर्यंत देशभरात ४२ कोटी ३३ लाख ३२ हजार ०९७ नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यापैकी ६ जुलै रोजी १९ लाख ०७ हजार २१६ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.

First Published on: July 7, 2021 10:49 AM
Exit mobile version