देशात २४ तासांत २२ हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; ४४२ जणांचा मृत्यू

देशात २४ तासांत २२ हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; ४४२ जणांचा मृत्यू

देशात २४ तासांत २४ हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; ४८७ जणांचा मृत्यू

देशात पुन्हा एकदा सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशात २२ हजार ७७१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ४४२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ४८ हजार ३१५ वर पोहोचली असून मृतांची संख्या १८ हजार ६५५ झाली आहे. तसेच २ लाख ३५ हजार ४३३ active केसेस असून ३ लाख ९४ हजार २२७ जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

राज्यात मागील २४ तासांत सर्वाधिक ६ हजार ३६४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून १९८ मृतांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ९२ हजार ९९०वर पोहोचला असून मृतांचा आकडा ८ हजार ३७६ झाला आहे. तसेच मागील २४ तासांत ३ हजार ५१५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १ लाख ४ हजार ६८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ५४.२४ टक्के एवढा आहे.

तर मुंबईत शुक्रवारी १ हजार ३७२ नव्या कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८१ हजार ६३४वर पोहोचला असून आतापर्यंत यापैकी ४ हजार ७५९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज मुंबईत १ हजार ६९८ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ५२ हजार ३९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत कोरोनाचे १ हजार १३९ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ५६ हजार ५२१ वर पोहोचला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.


हेही वाचा – चिंता कायम! पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा २० हजारांच्या उंबरठ्यावर!


 

First Published on: July 4, 2020 10:57 AM
Exit mobile version