Coronavirus Alert! देशात पुन्हा वाढला कोरोनाचा कहर; २४ तासांत २७५ जण मृत्यूमुखी!

Coronavirus Alert! देशात पुन्हा वाढला कोरोनाचा कहर; २४ तासांत २७५ जण मृत्यूमुखी!

वाढते कोरोनाचे संकट: सहा राज्यांमध्ये केंद्रीय आरोग्य पथक दाखल

देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा कहर वाढताना दिसत आहे. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत नव्या कोरोनाबाधितांची संख्या अधिक वाढत आहे. यामुळे रुग्ण रिकव्हर होण्याचे प्रमाण कमी होऊन ९५ टक्क्यांवर आले आहे. गेल्या एका दिवसात कोरोनाचे ४७ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. तर देशात आतापर्यंत ५ कोटी ८ लाखांहून अधिक लोकांची कोरोनाची लस घेतली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४७ हजार २६२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २७५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २३ हजार ९०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी १७ लाख ३४ हजार ५८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ६० हजार ४४१ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी १२ लाख ५ हजार १६० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ३ लाख ६८ हजार ४५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५ कोटी ८ लाख ४१ हजार २८६ जणांचे लसीकरण झाले आहे.

 

देशात २३ मार्चपर्यंत २३ कोटी ६४ लाख ३८ हजार ८६१ जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यापैकी १० लाख २५ हजार ६२८ जणांच्या कोरोना चाचण्या या काल (मंगळवार) दिवसभरात झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


हेही वाचा – MHA Guidelines: कोरोनाचा कहर! गृहमंत्रालयाने जारी केल्या नवीन गाईडलाईन


 

First Published on: March 24, 2021 10:39 AM
Exit mobile version