देशभरात २४ तासांत ९ हजार ९९६ नवे रुग्ण; ३५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू

देशभरात २४ तासांत ९ हजार ९९६ नवे रुग्ण; ३५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू

देशात समूह संसर्गास सुरुवात IMAचा इशारा

जगभर थैमान घालणाऱ्या जीवघेणा कोरोना विषाणू थांबायचं नाव घेत नाही आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ९ हजार ९९६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता २ लाख ८६ हजार ५८९ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये १ लाख ३७ हजार ४४८ रुग्ण अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर १ लाख ४१ हजार २९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ८ हजार १०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

भारतातील मृत्यूचा आकडा ८ हजार पार

दिवसेंदिवस भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. भारतात सध्या २ लाख ८७ हजार १५५ कोरोनाबाधितांना कोरोनाची बाधा झाली असून आतापर्यंत ८ हजार १०७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर आतापर्यंत १ लाख ४० हजार ९७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जगभरात कोरोना व्हायरसमुळे थैमान माजले आहे. अनेक देशांनी लॉकडाऊन घोषित करुन देखील कोरोना व्हायरसचे संक्रमण काही केल्याने थांबत नाही. जगभरात कोरोना व्हायरसने ७४ लाख ५१ हजार ५३२ लोक बाधित झाले आहेत. तर ४ लाख १८ हजार ८७२ लोक मृत्यू पावले आहेत. तर आतापर्यंत ३७ लाख ३३ हजार लोक बरे देखील झाले आहेत. लॉकडाऊनमुळे एका बाजुला अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे, तर दुसऱ्या बाजुला कोरोना व्हायरसमुळे लोक संक्रमित होत आहेत, या दुहेरी संकटामध्ये जग सध्या अडकले आहे.

३ हजार २५४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात बुधवारी तब्बल ३ हजार २५४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर कोरोना रुग्ण वाढीचा हा सर्वाधिक आकडा आहे. त्यामुळे सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही ९४ हजार ४१ वर पोहोचली आहे. यापैकी ४४ हजार ५१७ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ४६ हजार ७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


हेही वाचा – Coronavirus: कोरोनाच्या मृत्यूने ४ लाखांचा आकडा ओलांडला; वाचा सर्व आकडेवारी


 

First Published on: June 11, 2020 10:02 AM
Exit mobile version