भारताची ताकद पुन्हा वाढणार! US Navy ने Indian Navy ला दिले ‘हे’ विशेष हेलिकॉप्‍टर्स

भारताची ताकद पुन्हा वाढणार! US Navy ने Indian Navy ला दिले ‘हे’ विशेष हेलिकॉप्‍टर्स

भारताची ताकद पुन्हा वाढणार! US Navy ने Indian Navy ला दिले 'हे' विशेष हेलीकॉप्‍टर्स

भारतीय नौदलाच्या ताफ्यात विशेष हेलिकॉप्टरचा समावेश करण्यात आला आहे , ज्यामुळे भारताची ताकद पुन्हा एकदा वाढल्याचे समोर आले आहे. अमेरिकन नौदलाने दोन MH-60 R रोमियो हेलिकॉप्टर भारतीय नौदलाला दिली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर १६ जुलै रोजी सॅनडिएगो येथे झालेल्या कार्यक्रमात अमेरिकेत भारताचे राजदूत तरणजितसिंग संधू यांच्याकडे सोपविण्यात आले. भारताने अमेरिकेतून एकूण २४ हेलिकॉप्टर खरेदी केली असल्याचे सांगितले जात आहे.

या हेलिकॉप्टरचा वापर सैन्याच्या वाहतुकीसाठी, मदत आणि बचाव कार्यात आणि शत्रूच्या पाणबुड्यांविरूद्ध लढाऊ क्षमता वाढविण्यासाठी करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. या हेलिकॉप्टरची खास गोष्ट म्हणजे हे हेलिकॉप्टर सर्व हंगामात काम करण्यास सक्षम आहेत. देशाला हेलिकॉप्टर मिळण्याविषयी माहिती देताना भारताचे राजदूत तरनजितसिंग संधू यांनी यासंदर्भात ट्विट देखील केले. हे ट्विट करताना संधू यांनी असे म्हटले की, भारत-अमेरिकेची मैत्री नवीन उंचीला स्पर्श करत आहे.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या २०२० या वर्षीच्या भारत भेटीदरम्यान भारत सरकारने या हेलिकॉप्टर खरेदीस मान्यता दिली होती. हे हेलिकॉप्टर साडे दहा हजार किलोग्रॅमपेक्षा जास्त वजनाने उड्डाण करु शकतात आणि त्यांची गती ताशी २६७ किमी असल्याचे देखील सांगितले जात आहे. एमएच -60 आर हेलिकॉप्टर चालविणारे पायलट सध्या अमेरिकेत प्रशिक्षण घेत आहेत. तज्ज्ञांच्या मते, एमएच -60 आर हेलिकॉप्टरचा सैन्याच्या अनेक लढाऊ मोहिमेमध्ये समावेश केला जाऊ शकतो आणि देशाच्या आत येणार्‍या इतर कोणत्याही धमक्या दरम्यान त्याचा वापर केला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त, भारतीय नौदल आपातकालीन मोहिमांमध्ये आणि नैसर्गिक आपत्ती दरम्यानही हे हेलिकॉप्टर वापरता येऊ शकते.


 

First Published on: July 17, 2021 1:53 PM
Exit mobile version