CoronaVirus: देशात गेल्या २४ तासांत ३९०० नवे कोरोना रुग्ण; तर १९५ जणांचा मृत्यू

CoronaVirus: देशात गेल्या २४ तासांत ३९०० नवे कोरोना रुग्ण; तर १९५ जणांचा मृत्यू

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोनाचे रुग्ण कमी होण्याचे काही चिन्ह सध्या देशात दिसत नाही. गेल्या २४ तासात देशामध्ये तब्बत ३ हजार ९०० कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले असून धक्कादायक बाब म्हणजे १९५ जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक मृत्यूचा आकडा असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होण्याचे काही चिन्ह सध्या देशात दिसत नाही. गेल्या २४ तासात देशामध्ये तब्बत ३ हजार ९०० कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले असून धक्कादायक बाब म्हणजे १९५ जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक मृत्यूचा आकडा असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. त्यामुळे देशात आता ४६ हजार ४३३ कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या झाली आहे. त्यापैकी ३२ हजार १३४ जणांवर उपचार सुरू असून आतापर्यंत १२ हजार ७२७ जण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर १ हजार ५६८ लोकं मृत्यूमुखी पडले आहेत.

देशात अजूनही महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधितांचा सर्वाधिक आकडा पाहायला मिळत आहेत. तर त्यापाठोपाठ अनुक्रमे गुजरात आणि दिल्लीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १४ हजार ५४१ झाली असून मृतांचा आकडा ५८३ इतका आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २ हजार ४६५ इतकी आहे. तसेच गुजरामध्ये सध्या ५ हजार ८०४ कोरोना रुग्ण असून ३१९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार १९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

हेही वाचा –

CoronaCrisis: यंदा नोकरभरती नाही; राज्य सरकारचा निर्णय

First Published on: May 5, 2020 12:14 PM
Exit mobile version