Good News! चार महिन्यांत येणार कोरोनाची लस, आरोग्य मंत्र्यांची माहिती

Good News! चार महिन्यांत येणार कोरोनाची लस, आरोग्य मंत्र्यांची माहिती

केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांची टीका

देशात कोरोनाचा कहर अद्याप सुरू असून कोरोनाची लस कधी उपलब्ध होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आगामी वर्षातील पहिल्या तीन-चार महिन्यांत देशातील नागरिकांना कोरोनावरील लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसेच, ही लस जुलै-ऑगस्टपर्यंत २५ ते ३० कोटी लोकांना लस देण्याची योजना आहे. यासह आम्ही तयारी करत आहोत. अशी दिलासादायक माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिल्लीतील बुरारी येथील निरंकारी समागम मैदानावर आंदोलन करत असलेल्या शेतकरी आंदोलकांना कोरोनाचे नियम पाळावे, अशी विनंती केली. यासह ते असेही म्हणाले की, पुढच्या वर्षी पहिल्या तीन-चार महिन्यांत देशातील लोकांना कोरोनावरील लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. “माझी सर्वांना विनंती आहे की त्यांनी कोविडचे नियम लक्षात ठेवावेत. त्यानुसार वर्तन करावे. यामध्ये तोंडाला मास्क लावणे आणि फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करणे आवश्यक आहे. आपल्या आरोग्यासाठी ही महत्वाची बाब आहे.”, असे आवाहनही आंदोलक शेतकऱ्यांना हर्षवर्धन यांनी केले.

First Published on: November 30, 2020 5:40 PM
Exit mobile version