Video: भारतीय वायुदलाच्या जवानांचे थरारक प्रात्यक्षिक

Video: भारतीय वायुदलाच्या जवानांचे थरारक प्रात्यक्षिक

सौजन्य- ANI news

भारतीय वायुदल अर्थात इंडियन एअरफोर्स ही भारताची शान आहे. आज देशभरात ६८वा इंडियन एअरफोर्सडे साजरा केला जात आहे. गाझियाबादच्या हिंडन एअर बेसवर आज भारतीय वायुदलाकडून विशेष प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. यावेळी भारतीय वायुदलाच्या जवानांनी खास हवेमध्ये थरारक प्रात्यक्षिक करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या थरारक प्रात्यक्षिकांची  गेल्या २ महिन्यांपासून तयारी सुरु होती. याशिवाय आज गाझियाबादमध्ये भारतीय वायुदलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जवानांना पुरस्कार बहाल करत त्यांचा सन्मान करण्यात आला. ६८ व्या एअरफोर्स डेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आजच्या सोहळ्यामध्ये व्हिंटेज डकोटा, फ्रंट लाईन जेटस् सुखोई ३०, जॅग्वार आणि एमआयजी २९ या फायटर विमानांची परेडही झाली. या परेडमध्ये ‘तेजस’ हे स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमानही सहभागी झाले.

वायुदलाच्या जवानांचे हवाई प्रात्यक्षिक


वाचा: ‘सुखोई ३०’ हे फायटर विमान होणार आणखी भेदक

First Published on: October 8, 2018 10:57 AM
Exit mobile version