‘जैश’ संघटेला हादरा; या वाँटेड दहशतवाद्यांचा झाला खात्मा!

‘जैश’ संघटेला हादरा; या वाँटेड दहशतवाद्यांचा झाला खात्मा!

मसूद अझहर

पुलवामातील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात भारताचे ४४ जवान शहीद झाले होते. या हल्ल्यांचा बदला घेण्यास भारताने सुरुवाती केली असल्याचे आजच्या कारवाईनंतर म्हणता येऊ शकते. आज भारताच्या वायूसेनेने पाकव्याप्त काश्मिरमध्ये बॉम्बहल्ला करून जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या कॅम्पला लक्ष बनवले. या हल्ल्यात संघटनेतील साधारण ३०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. जैश-ए-मोहम्मद संघटेचा प्रमुख मौलाना मसूद अजहर जरी अद्याप भारतीय सेनेच्या हाती लागला नसला तरीही त्याची काही खास आणि विश्वासू माणसं आजच्या हल्ल्यात मारली गेली. त्यामुळे जैश संघटनेला किंबहुना मौलाना मसूद अजहरला हा मोठा झटका आहे.

१. मौलाना मसूद अजहरचा मेहुणा अजहर युसुफ याचादेखील खात्मा आजच्या हल्ल्यात झाला आहे. अजहर युसुफ हा जागतिक पातळीवरील वाँडेट दहशतवादी असून त्याच्याविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीसदेखील जारी केली होती.

अजहर युसुफ

२ जैशचा म्होरक्या मसूद अझरचा मोठा भाऊ इब्राहिम अझर हा आजच्या हल्ल्यात मारला गेला आहे. १९९९ मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या आयसी ८१४ या विमानाचं अपहरण ज्या दहशतवाद्यांनी केलं होतं त्यात इब्राहिमचा समावेश होता.

इब्राहिम अजहर

३. काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा मुख्य सूत्रधार असलेला जैशचा दहशतवादी मुफ्ती अझर खान काश्मिरी आजच्या हल्ल्यात मारला गेला आहे.

मुफ्ती अजहर खान

४. अफगाणिस्तान आणि काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा आणखी एक मुख्य सूत्रधार मोलाना अम्मर याचा या हल्ल्यात खात्मा झाला आहे.

मौलाना अम्मर

५. मसूद अझरचा आणखी एक भाऊ मौलाना तल्हा सैफ याचाही या हल्ल्यात खात्मा झाला आहे.

मौलाना तल्हा सैफ
First Published on: February 26, 2019 9:46 PM
Exit mobile version