जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराची मोठी कारवाई

जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराची मोठी कारवाई

जम्मू-काश्मीर परिसरातील नागरिकांना वारंवार दहशतवाद्यांकडून टार्गेट केले जाते. त्यामुळे भारतीय लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चममक होत असते. नुकताच जम्मू-काश्मिरमधील अनंतनाग (Anantnag) भागात दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाल्याची माहिती समोर येत आहे. या चकमकीत दोन ते तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. या कारवाईबाबत काश्मीर पोलिसांनी ट्वीट करत माहिती दिली. (indian army and kashmir police action in anantnag of jammu kashmir two to three terroriest encounter)

काश्मीप पोलिसांच्या माहितीनुसार, अनंतनागमधील अनंदवन संगम भागात दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक (Encounter) झाली. या चकमकीत 2 ते 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले. तसेच काश्मीर पोलीस आणि लष्कराचे जवान या भागात सातत्याने कारवाई करत आहेत.

राजौरीमध्ये पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

जम्मू आणि काश्मीरच्या राजौरीमध्ये शुक्रवारी (5 मे) रोजी भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत भारतीय लष्कराचे 5 जवान शहीद झाले होते.

राजौरीच्या मुठभेड जिल्ह्याच्या जंगलात दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली. त्यानंतर संपूर्ण राजौरीमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीदरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात लष्कराचे दोन जवान शहीद झाले. तर या हल्ल्यात एका लष्कराच्या अधिकाऱ्यासह चार जवान जखमी झाले.


हेही वाचा – कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाचा ‘हा’ आहे HERO; वाचा सविस्तर

First Published on: May 14, 2023 3:14 PM
Exit mobile version