चिनार कॉर्प्सचे सोशल मीडिया पेज ब्लॉक, भारतीय सैन्याने फेसबुक-इंस्टाग्रामकडून मागितलं उत्तर

चिनार कॉर्प्सचे सोशल मीडिया पेज ब्लॉक, भारतीय सैन्याने फेसबुक-इंस्टाग्रामकडून मागितलं उत्तर

चिनार कॉर्प्सचे सोशल मीडिया पेज ब्लॉक, भारतीय सैन्याने फेसबुक-इंस्टाग्रामकडून मागितलं उत्तर

भारतीय सैन्यातील चीनार कॉर्प्सचे सोशल मीडिया हँडल्स फेसबुक आणि इंस्टाग्राम गेल्या आठवडाभरापासून बंद ठेवण्यात आले आहेत. मंगळवारी भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. फेसबुककडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजेस सीमेवर पसरवणाऱ्या खोट्या अफवा रोखण्यासाठी आणि काश्मीरी नागरिकांना महत्त्वाची माहिती पुरवण्यासाठी बनवण्यात आले होते. परंतु हे पेज आता ब्लॉक करण्यात आले आहेत. फेसबुककडून या प्रकरणात लेखी उत्तर मागितले होते परंतु त्यांच्याकडून काही उत्तर प्राप्त झाले नाही.

कश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या लोकप्रिय XV कोर ला चिनार कॉर्प्स या नावाने अधिक ओळखले जाते. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर या चिनार कॉर्प्सच्या पेजला ब्लॉक केलं आहे. सध्या या पेजवर गेल्यास एक स्क्रीनवर एक मेसेज दिसतो, त्यामध्ये असे म्हटलं आहे की, तुम्ही ज्या पेजला फॉलो करु इच्छिता तो चुकीचा आहे किंवा त्याला हटवण्यात आले आहे.

फेसबुक आणि इंस्टाग्राम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. नियमांनुसार एखादी सोशल मीडिया कंपनी कोणत्याही पेजला तेव्हाच हवण्याची कारवाई करते जेव्हा त्या वेबसाईटवर टाकण्यात आलेली माहिती कंपनीच्या नियमात बसत नसेल. तसेच त्यांच्या नियमांचे पालन होत नसेल आणि उपलब्ध झालेली माहिती वादग्रस्त असेल ज्याची वापरकर्त्याविरोधात तक्रार झाली असेल.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचा सोहळा दाखवण्यासाठी सोशल मीडियाचा मोठा वापर करण्यात आला होता. सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आले होते. दोन्ही पेज ब्लॉक करण्यामागे पाकिस्तानचे कनेक्शन असल्याचे समजतं आहे. भारतीय सैन्याच्या या पेजला पाकिस्तानातून रिपोर्ट करण्यात आले होते.


हेही वाचा : CM पदासाठी दाउदसोबतही नीतीश कुमार हातमिळवणी करतील, लालु प्रसाद यादव यांची टोलेबाजी

First Published on: February 9, 2022 8:07 AM
Exit mobile version