घरताज्या घडामोडीCM पदासाठी दाउदसोबतही नीतीश कुमार हातमिळवणी करतील, लालु प्रसाद यादव यांची टोलेबाजी

CM पदासाठी दाउदसोबतही नीतीश कुमार हातमिळवणी करतील, लालु प्रसाद यादव यांची टोलेबाजी

Subscribe

राष्ट्रीय जनता दल (RJD) च्या १० फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीसाठी पार्टी अध्यक्ष लालू प्रसाद यादव हे पटना गाठणार आहेत. त्याआधीच मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यावर लालु प्रसाद यादव यांनी जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री बनण्यासाठी नीतीश कुमार हे कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि कोणाशीही हात मिळवू शकतात, असा दावा त्यांनी केला आहे. भाजपचे खासदार छेदी पासवान यांनी केलेल्या वक्तव्यालाही लालु यादव यांनी पाठिंबा दिला आहे.

लालु प्रसाद यादव हे पटना येते रवाना होण्याआधीच दिल्लीत पत्रकारांसोबत बोलत होते. त्यावेळी भाजपचे खासदार छेदी पासवान यांनी नीतीश कुमारांवर केलेल्या टिप्पणीचे त्यांनी समर्थन केले. नीतीश कुमार हे मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कोणाशीही हात मिळवतील असे वक्तव्य खासदार छेदी पासवान यांनी केले होते. संसदेत एका प्रश्न उत्तराच्या तासामध्ये पासवान यांनी नीतीश कुमार यांच्यावर टीका करताना थेट कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचेही उदाहरण दिले होते. मुख्यमंत्री बनण्यासाठी नीतीश कुमार हे दाउद इब्राहिमसोबतही हात मिळवू शकतात, असा दावा त्यांनी केला होता.

- Advertisement -

लालु प्रसाद यादव पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला मी जात आहे. त्यानंतर १५ फेब्रुवारीला रांची येथे राजदचे अधिवेशन आहे. लालू यांनी पार्टीचे नेतृत्व हे तेजस्वी यांच्याकडे सोपावण्यात येणार असल्याच्या वृत्ताचेही खंडन केले. कोणीतरी याबाबतची अफवा उडवत असल्याचेही ते म्हणाले. यूपीच्या निवडणुकीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाबाबत बोलताना लालू प्रसाद म्हणाले की यूपीमध्ये यंदा भाजपचा सुपडा साफ होईल. यूपी आणि देशातही लोक आता भाजपच्या खोटेपणापासून मुक्ती शोधत आहेत. लालू यांनी बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत, भाजप आणि जदयूच्या लोकांवर निशाणा साधला.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -