गुजरातच्या समुद्रात पाकिस्तानी बोटीतून नऊ तस्करांसह 300 कोटींचे हेरॉईन जप्त

गुजरातच्या समुद्रात पाकिस्तानी बोटीतून नऊ तस्करांसह 300 कोटींचे हेरॉईन जप्त

गुजरातच्या समुद्रात पाकिस्तानी बोटीतून नऊ तस्करांसह 300 कोटींचे हेरॉईन जप्त

भारताने पाकिस्तानतून आलेला मोठा ड्रग्स साठा जप्त केला आहे, भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने राज्याच्या किनारपट्टीपासून अरबी समुद्रात नऊ क्रू सदस्यांसह एक पाकिस्तानी बोट अडवली. या बोटीतून 280 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. संरक्षण प्रवक्त्याने सोमवारी ही माहिती दिली.

प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, तटरक्षक दलाच्या जहाजांनी सतर्कता दाखवत पाकिस्तानी बोट ‘अल हज’ला घेराव घालून बोटीची झडती घेतली. यावेळी बोटीतून सुमारे 56 किलो वजनाचे 280 कोटी रुपयांचा हेरॉईन हा अमली पदार्थ सापडला आहे. एटीएसने यावेळी नऊ पाकिस्तानी तस्करांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी संबंधित बोट आणि त्यातील चालक आणि तस्करांना गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदरात नेण्यात आले आहे.

तटरक्षक दलाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, मासेमारीसाठी वापरली जाणारी ही बोट वेगाने गुजरातच्या दिशेने पुढे जात होती. ही बोट रोखण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने प्रयत्न केला मात्र बोट थांबली नाही. यावेळी तटरक्षक दलातील जवानांनी बोटीच्या दिशेने गोळीबार केला, या गोळीबारात एक क्रू मेंबर जखमी झाला आणि इतर दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. यावेळी बोट ताब्यात घेण्यात आली असून बोट जड असल्याने ICGS अंकित बोटीलाला मदतीसाठी वळवण्यात आले. आज दुपारी ३ वाजेपर्यंत ही पाकिस्तानी बोट जखाऊ बंदरात पोहोचणे अपेक्षित आहे.

पाकिस्तान सीमेवर ड्रग्ज पकडल्याच्या बातम्या सतत येत असतात. सीमाशुल्क विभागाने रविवारी पंजाबच्या अटारी सीमेवर 100 किलोहून अधिक हेरॉईन जप्त केले. अफगाणिस्तानातून हे अमली पदार्थ आले होते. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत सुमारे 700 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. सीमाशुल्क विभागाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, दिल्लीस्थित एका व्यक्तीने अफगाणिस्तानातून आयात केलेल्या मालात हेरॉईन लपवले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.


हिटलर प्रवृत्तीने वागायचं असेल, तर संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा : देवेंद्र फडणवीस

First Published on: April 25, 2022 1:43 PM
Exit mobile version