ऑस्ट्रेलियन पोलिसांकडून भारतीय गुन्हेगाराचा शोध; माहिती देणाऱ्याला मिळणार 5 कोटींचे बक्षीस

ऑस्ट्रेलियन पोलिसांकडून भारतीय गुन्हेगाराचा शोध; माहिती देणाऱ्याला मिळणार 5 कोटींचे बक्षीस

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक घटना घडामोडी घडत असतात. अशातच ऑस्ट्रेलियातील पोलीस एका भारतीय व्यक्तीचा शोध घेत आहेत. या व्यक्तिचा गुन्हा सुद्धा मोठा आहे. ऑस्ट्रेलियामध्ये एका 24 वर्षीय तरुणीची हत्या करून पळून गेलेल्या भारतीय व्यक्तीचा ऑस्ट्रेलियामधील पोलीस अधिक सक्रियपणे शोध घेत आहेत. दरम्यान या आरोपीची माहिती देणाऱ्याला किंवा आरोपीला शोधून देणाऱ्याला मोठ्या रकमेचे बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आले आहे. (Indian criminal hunted by Australian police; 5 crore reward for the informer)

ऑस्ट्रेलियामध्ये 24 वर्षीय तरुणीच्या हत्येची घटना घडली. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये घडली आहे. 24 वर्षीय टोयाह कॉर्डिंगले ही 2018 मध्ये क्वीन्सलँड बीचवर तिच्या कुत्र्याला फिरवत होती. यादरम्यान राजविंदर सिंग नावाच्या व्यक्तीने तिची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेला चार वर्षे उलटून गेली तरी ऑस्ट्रेलियन पोलिसांना आरोपीचा कोणताही सुगावा लागलेला नाही. त्यामुळे आता पोलिसांनी या आरोपीला शोधून देणाऱ्याला किंवा आरोपीची माहिती देणाऱ्याला 1 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच 5 कोटींहून अधिक रकमेचे बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलियन पोलिसांनी राजविंदर सिंग या आरोपीची माहिती किंवा त्याचा ठावठिकाणा  याविषयी माहिती मिळाल्यावर नागरिकांना ऑनलाइन पोर्टलद्वारे क्वीन्सलँड पोलिसांना माहिती देण्याची विनंती केली आहे. याचसोबत पोलिसांनी असेही म्हटले की जर ऑस्ट्रेलियातील कोणत्याही व्यक्तीला आरोपीबद्दल माहिती मिळाली तर ते थेट 1800-333-000 वर संपर्क साडू शकता.

ज्या कोणाला राजविंदर सिंगबद्दल माहिती असेल तो क्वीन्सलँड पोलिसांशी संपर्क साधेल, असेही पोलिसांनी म्हटले. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजविंदर सिंह 38 वर्षांचा आहे. राजविंदर क्वीन्सलँडमध्ये मेल नर्स म्हणून काम करत होता. टोयाह कॉर्डिंगलेच्या हत्येनंतर दोन दिवसांनी याने ऑस्ट्रेलियामधून पळ काढला. पळून जाताना त्याने पत्नी आणि तीन मुलांचा विचार ना करता त्यांना ऑस्ट्रेलियामध्येच सोडून गेला.

हत्येनंतर 22 ऑक्टोबर रोजी राजविंदर सिडनीला गेला आणि तेथून तो विमानाने भारतात पोहोचला. तो भारतात आला असल्याची खात्री सुद्धा करण्यात आली. राजविंदर हा पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील बुट्टर कलानचा राहणार आहे. ऑस्ट्रेलियन पोलिसांनी बक्षीस जाहीर केले त्यासोबतच भावनिक आवाहनसुद्धा केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे की एखाद्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी 1 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.


हे ही वाचा –  फेसबुकचे इंडिया हेड अजित मोहन यांचा राजीनामा; कंपनीने सांगितले कारण…

First Published on: November 4, 2022 11:36 AM
Exit mobile version