करोना: चीनमधील भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळा यंदा रद्द

करोना: चीनमधील भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळा यंदा रद्द

तेहरानमध्ये अडकले महाराष्ट्रातील ६०० भाविक

चीनमध्ये करोना विषाणूच्या संसर्गामुळे अनेक बळी गेले आहेत. ही संख्या पाहता बीजिंगमधील भारतीय दूतावासाने यावर्षी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमध्ये करोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत २५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण ८३० लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. यांपैकी २४ जणांचा मृत्यू मध्य चीनमधील हुबेई प्रांतात झाला आहे. तर एकाचा मृत्यू उत्तर चीनमधील हुबेई येथे झाला आहे. चीनमधील २० प्रांतीय भागांमध्ये एकूण १०७२ संशयित आढळले आहेत. करोना या विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे सरासरी वय ७३ वर्ष इतके आहे. मृतांमधील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ही ८९ वर्षांची आहे. तर, या विषाणूला बळी पडलेल्यांमध्ये सर्वात कमी वयाची व्यक्ती ही ४८ वर्षांची आहे.

चीनमधील भारतीयांना सर्वतोपरी मदत 

कोरोन विषाणू संसर्ग हा भारतीयांसाठी देखील एक चिंतेचा विषय बनला आहे. याचे कारण म्हणजे, वुहान आणि आसपासच्या परिसरात ७०० भारतीय विद्यार्थी वास्तव्यास आहेत. यांपैकी बरेचसे विद्यार्थी हे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. मात्र चीनमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीयांना सर्वतोपरी मदत दिली जाईल असे चीनी अधिकाऱ्याने सांगितले आहे.

२५ भारतीय विद्यार्थी अडकले

२५ जानेवारीला दरवर्षी चीनी नववर्ष साजरे केले जाते. चीनच्या शहरांमध्ये कोट्यवधी नागरिक राहतात. या दिवशी नागरिकांची मोठ्या संख्येने रस्त्यावर गर्दी होते. हे लक्षात घेऊन गाड्या, ट्रेन आणि विमानांसह विविध वाहतुकीची माध्यमे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हुबेई प्रांतात येणाऱ्या हुगांग, एझाओ, झिजियांग, क्विनजिआंग आणि वुहान या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे वुहानमध्ये २५ भारतीय विद्यार्थी अडकले आहेत.


हेही वाचा – चक्क ७१ हजार टूथपिक्सने तयार केला राष्ट्राचा ध्वज


!

First Published on: January 24, 2020 7:51 PM
Exit mobile version