Electric scooter fire : इलेक्ट्रिक स्कूटर आग घटना रोखण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; नव्या लाँचिंगवर बंदी

Electric scooter fire : इलेक्ट्रिक स्कूटर आग घटना रोखण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; नव्या लाँचिंगवर बंदी

Electric scooter fire : इलेक्ट्रिक स्कूटर आगी घटना रोखण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; नव्या लाँचिंगवर बंदी

भारतात अलीकडेच इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागून अनेक भीषण घटना घडल्या आहेत. यामुळे इलेक्ट्रिक स्कूटरच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने देशात नव्या इलेक्ट्रिक स्टूकरच्या लाँचिंगवर बंदी घातली आहे.

इलेक्ट्रिक स्कूटर बनवणाऱ्या कंपन्यांना आगीच्या घटनांचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणतेही नवीन वाहन बाजारात सुरू करू नये, असे सांगण्यात आले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MORTH) सोमवारी इलेक्ट्रिक वाहने बनवणाऱ्या कंपन्यांची बैठक बोलावली होती. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटनांवर चर्चा करण्यात आली.यात एका अधिकाऱ्याने सांगितले की, ईव्ही निर्मात्यांना या घटनांचा तपास पूर्ण होईपर्यंत नवीन वाहने लॉन्च करु नका असे तोंडी सांगण्यात आले आहे. स्कूटरच्या एका बॅचमध्ये आग लागल्याची घटना घडली होती. ही घटना घडलेली बॅच बाजारातून परत मागे घ्यावी, असे या कंपन्यांना सांगण्यात आले आहे. यानंतर अनेक कंपन्यांनी ही प्रक्रिया सुरू केली आहे.

अलीकडे इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या. यात जीवितहानीसह वित्तहानी देखील झाली. या घटना पाहता कंपन्यांनी स्वत:हून अशी वाहने परत मागे घ्यावी, असे परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते. गडकरींच्या विधानानंतर एका आठवड्यानंतर ओला, ओकिनावा आणि प्युअर ईव्हीने जवळपास 7000 इलेक्ट्रिक वाहने बाजारातून परत मागवली आहेत.

सोमवारी झालेल्या बैठकीतही अशी वाहने परत मागे घेण्यास सांगण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले . यासोबतच मोटार वाहन कायद्यातील तरतुदींबाबत कंपन्यांना सांगण्यात आले. या अंतर्गत केंद्र अशी वाहने जबरदस्तीने परत मागे घेऊ शकते आणि अशी वाहने बनवणाऱ्या कंपन्यांवर दंड आकारू शकते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या कंपन्यांच्या स्कूटरला आग लागली नाही त्यांनाही विकलेली वाहने दुरुस्त करण्यास सांगितले आहे. मंत्रालयाने कंपन्यांना चार्जिंग सेफ्ट आकारणे आणि आगीच्या घटना टाळण्याबाबत ग्राहकांना शिक्षित करण्यास सांगितले आहे.


केंद्र सरकार ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म करणार लाँच; छोट्या-मोठ्या वस्तूंची करू शकता खरेदी

First Published on: April 29, 2022 9:22 AM
Exit mobile version