कुलभूषण जाधव यांना सोडा; परराष्ट्र मंत्रालयाचे पाकिस्तानला निवेदन

कुलभूषण जाधव यांना सोडा; परराष्ट्र मंत्रालयाचे पाकिस्तानला निवेदन

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

कुलभूषण जाधव प्रकरणावर आज राज्यसभेतही चर्चा झाली. यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी कुलभूषण प्रकरणी भारताच्या बाजूने लढणारे ज्येष्ठ वकील अॅड. हरिश साळवे यांचे कोतुक केले. याशिवाय, पररराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला ‘कुलभूषण यांची सूटका करावी’, असे निवेदन पाठवले आहे. एस. जयशंकर यांनी आपण स्वत: हे निवेदन पाठवल्याचे म्हटले आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे राज्यसभेत स्वागत करण्यात आले. कुलभूषण जाधव प्रकरणी बुधवारी संध्याकाळी आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने भारताच्या बाजूने निकाल दिला. कुलभूषण यांच्या फाशीवरील स्थगिती कायम ठेवताना, त्यांना झालेली अटक आणि त्यांच्या शिक्षेचा पुनर्विचार करण्याचे आदेश कोर्टाने पाकिस्तानला दिले आहेत. तसेच कुलभूषण जाधव यांना कॉन्सुलर असेस् (भारतीय दूतावासाशी संपर्क) देण्यात यावे, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.

जयशंकर यांनी कुलभूषण यांच्या कुटुंबियांना दिले वचन

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर राज्यसभेत म्हणाले की, कुलभूषण जाधव यांना अटक करून पाकिस्तानने १९६३ सालच्या व्हिएन्ना कराराचा भंग केला आहे, हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालात स्पष्ट झाले आहे. आम्ही पुन्हा एकदा पाकिस्तानला कुलभूषण जाधव यांना सोडण्याचे सांगत आहोत. कुलभूषम जाधव यांना वाचवण्यासाठी आम्ही २०१७ साली आंतररारष्ट्रीय न्यायालयात खटला लढवण्यासाठी विशेष कमिटी नेमली होती. कुलभूषण यांच्या कुटुंबियांना खुप अवघड परिस्थितीतून जावे लागले. मात्र, मी त्यांना शब्द तो की, कुलभूषण यांच्या सुरक्षेसाठी देश लढत राहील आणि त्यांना देशात परत आणण्यासाठी देखील आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत.

यावर राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली. ‘आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे संपूर्ण राज्यसभेने स्वागत केल्याचे पाहून मला आनंद होत आहे. कुलभूषण यांची आपण लवकरच सुटका व्हावी यासाठी प्रयत्न करु’, असे व्यंकय्या नायडू म्हणाले.


हेही वाचा – कुलभूषण जाधव यांच्या फाशीवरील स्थगिती कायम

First Published on: July 18, 2019 11:29 AM
Exit mobile version