भारतीय नौदलाची मोठी कारवाई! पाकिस्तानी नौकेसह ३ हजार कोटी रुपयांचे ड्रग्स केले जप्त

भारतीय नौदलाची मोठी कारवाई! पाकिस्तानी नौकेसह ३ हजार कोटी रुपयांचे ड्रग्स केले जप्त

भारतीय नौदलाची मोठी कारवाई! पाकिस्तानी नौकेसह ३ हजार कोटी रुपयांचे ड्रग्स केले जप्त

भारतीय नौदलाला अरबी समुद्रात पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यात मोठे यश आले आहे. भारतीय नौदलाने अरबी समुद्रात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या पाकिस्तानी मच्छीमार नौका ताब्यात घेतली आहे. या नौकेतून तब्बल ३००० कोटी रुपयांचे ड्रग्स नौदलाने जप्त केले आहे. या ड्रग्सचा एवढा साठा भारत, मालदीव आणि श्रीलंकासारख्या देशांमध्ये अवैध्यरित्या पुरवला जाणार होता.

३०० किलो अमली पदार्थ जप्त

भारतीय नौदलाचे INS सुवर्ण हे जहाज अरबी समुद्रातील अवैध्य खुप्या हालचालींवर नजर ठेवून होते. यादरम्यान अरबी समुद्रात एक मासेमारी करणारी नौका संशयास्पदरित्या फिरताना आढळली. यावेळी भारतीय नौदलाने आपले कमांडो पाण्यात उतरवत त्या संशयास्पद नौकेला ताब्यात घेतले. या नौकेत जवळपास ३०० किलोहून अधिक अमली पदार्थ्यांचा साठा भारतीय नौदलाच्या हाती लागला आहे. भारतीय नौदल कमांडर विवेक मधवाल यांना सांगिलते की, जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत जवळपास ३ हजार कोटी इतकी आहे. तसेच या पाकिस्तानी नौकेत असलेल्या पाच तस्करांना ताब्यात घेतले असून अधिक चौकशीसाठी या पाचही जणांना कोच्ची येथे आणले जात आहे. दरम्यान या तस्करांचे जहाजही जप्त करण्यात आली आहे.


 

First Published on: April 20, 2021 12:08 PM
Exit mobile version