Masterchef Australia: भारतीय वंशाचा जस्टिन नारायण झाला मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया २०२१

Masterchef Australia: भारतीय वंशाचा जस्टिन नारायण झाला मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया २०२१

Masterchef Australia: भारतीय वंशाचा जस्टिन नारायण झाला मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया २०२१

भारतीय वंशाचा जस्टिन नारायणने मास्टरशेफ आस्ट्रेलिया सीझन १३ चे विजेते पद पटकावले आहे. जस्टिन नारायण मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया जिंकणारा दुसरा भारतीय वंशाचा व्यक्ती आहे. या स्पर्धेमध्ये बक्षीस स्वरुपात जस्टिनला २.५ लाख डॉलर (जवळपास १.८ कोटी रुपये) मिळाले आहेत. यापूर्वी २०१८मध्ये जेल गार्ड शशि चेलियाने हा कुकिंग रिअॅलिटी शो जिंकला होता.

पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये राहणारा जस्टिन नारायण अवघ्या २७ वर्षांचा आहे. भारतीय वंशाचा असल्यामुळे जस्टिन नारायणवर भारताकडून शुभेच्छाचा वर्षावर होत आहे. जस्टिन विजेता ठरल्यानंतर ट्विटरवर टॉप ट्रेंडमध्ये होता. मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाने अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ट्रॉफीसोबत जस्टिन नारायणचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टला भारतीय लोकांनी खूप लाईक्स केले आहे. मास्टरशेफ ऑस्ट्रेलियन या इस्टाग्राम पेजवरून जस्टिनचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘आमच्या #MasterChefAU 2021च्या विजेत्याला शुभेच्छा.’


हेही वाचा – Video: प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरावर वीज कोसळून ध्वजस्तंभाचे नुकसान, मंदिराच्या भिंती पडला काळ्या


 

First Published on: July 14, 2021 4:04 PM
Exit mobile version