राजकीय पक्षांनी जाहिरातबाजीवर किती पैसे खर्च केले? किंमत ऐकून व्हाल थक्क!

राजकीय पक्षांनी जाहिरातबाजीवर किती पैसे खर्च केले? किंमत ऐकून व्हाल थक्क!

सोशल मीडिया

लोकसभा निवडणूकचे सातही टप्पे पार पडले आहेत. या निवडणुकीचा निकाल २३ मे रोज लागणार आहे. या निवडणुकीत जिंकून यावे म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसले. देशभरात प्रचारसभा घेऊन प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी परस्परावरर आरोप-प्रत्यारोपाची एक अखंड मालिका सुरु ठेवली. या निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सत्ता मिळावी, आपला पक्ष जिंकून यावा यासाठी देशातील प्रत्येक पक्षाने जाहिरातबाजीवर प्रचंड भर टाकला. ‘फेसबुक अॅड लायबररी रिपोर्ट’नुसार फेब्रुवारी ते मे महिन्यादरम्यान भारतातील राजकीय पक्षांनी तब्बल ५३ कोटी रुपयांची जाहिरातबाजी फेसबुक आणि गुगलवर केल्याचे उघड झाले आहे.

भाजप जाहिरातबाजीत अव्वल

‘फेसबुक अॅड लायबररी रिपोर्ट’नुसार, फेब्रुवारी ते १५ मे पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या तब्बल १.२१ लाख राजकीय जाहीराती फेसबुकवर टाकण्यात आल्या. या जाहिरातींची किंमत २६.५ कोटी रुपये इतकी आहे. यासोबतच गुगल, यूट्यूब आणि इतर डिजिटल माध्यमांवर २७.३६ कोटी रुपयांची जाहिरातबाजी करण्यात आली. या जाहीरातींची संख्या १४ हजार ८३७ इतकी आहे. देशात निवडणुकीच्या काळात राजकीय जाहिरातबाजीत भाजपचे स्थान अव्वल आहे. यासोबतच भाजपने  आणखी २५०० जाहिरातींसाठी ४.२३ कोटी रुपये खर्च केले. या जाहीरातींमध्ये ‘माय फर्स्ट वोट टू मोदी’, ‘भारत के मन की बात’, ‘नेशन विथ नमो’ यांचा समावेश आहे. त्यानंतर समाजमाध्यमांवरती ४ कोटी रुपयांची जाहीरातबाजी भाजपने केली. या जाहीराती समाज माध्यमांच्यामार्फत तब्बल २० कोटी लोकांपर्यंत पोहोचल्या. गुगलवर भाजपने १७ कोटी रुपये खर्च केले.

काँग्रेसने किती खर्च केले?

भाजपच्या मानाने इतर पक्षांनी समाज माध्यमांवर कमी प्रमाणात जाहिरातबाजी केली. भारतीय काँग्रेस पक्षाने फेसबुकवर ३६८६ जाहीरातींसाठी १.४६ कोटी रुपये खर्च केले. तर गूगलवर ४२५ जाहिरातींसाठी २.७१ कोटी खर्च केले.

इतर पक्षांनी किती खर्च केले?

प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस या पक्षाने जाहिरातीसाठी २९.२८ लाख रुपये खर्च केले. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने १३.६२ लाख खर्च केले. त्याचबरोबर अहवालानुसार आम आदमी पक्षाने १९ फेब्रुवारी अगोदर आम आदमी पक्षाने जाहिरातबाजीसाठी २.१८ कोटी रुपये खर्च केल्याचे समोर आले आहे.

First Published on: May 20, 2019 8:33 AM
Exit mobile version